बापट आणि पोलिसांदेखत 'आपलं घर'चा सचिन अग्रवाल पळाला!

By: मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | Last Updated: Wednesday, 20 April 2016 7:39 AM
बापट आणि पोलिसांदेखत 'आपलं घर'चा सचिन अग्रवाल पळाला!

पुणे : पुण्यात ‘आपलं घर’ योजनेत हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या ‘मेपल’चा सचिन अग्रवाल पोलिसांसमोरच पसार झाला. सचिन अग्रवालवर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनीच त्याला पलायन करण्यात मदत केली.

पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि सचिन अग्रवाल एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात लाईव्ह होते. याची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिस तातडीने सचिन अग्रवालला अटक करण्यासाठी संबंधित वृत्तवाहिनीच्या कार्यालयात पोहोचले. मात्र जुजबी चौकशी करुन अग्रवाल इमारतीत नसल्याचं सांगत पोलिसांनी काढता पाय घेतला.

त्यानंतर अगदी पाच मिनिटात कार्यक्रम संपला आणि पालकमंत्री गिरीष बापट खाली आले. त्यानंतर काहीच वेळात ‘आपलं घर’चा प्रवर्तक सचिन अग्रवालही इमारतीखाली आला. त्यावेळी बापट आणि पोलिसांदेखतच त्याने तिथून एका दुचाकीवरुन पळ काढला.

त्यामुळे पुणे पोलिसांनी फक्त अग्रवालवर कारवाईचा फार्स केला का? वृत्तवाहिनीच्या कार्यालयात अशी काय जादू झाली की पोलिसांना अग्रवाल दिसला नाही? पोलीस गेल्यानंतर अग्रवाल त्याच इमारतीतून बाहेर कसा आला? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्यामुळे पुणे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

पाहा व्हिडीओ : गिरीश बापट आणि पोलिसांदेखत पळून गेला

First Published: Tuesday, 19 April 2016 10:18 PM

Related Stories

रायगड झेडपी अध्यक्षा आदिती तटकरे शरद पवारांच्या भेटीला
रायगड झेडपी अध्यक्षा आदिती तटकरे शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आदिती तटकरे

गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार
गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार

नवी दिल्ली : विमानसेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात शिवसेना

कोल्हापुरात पहिलं पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र!
कोल्हापुरात पहिलं पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र!

कोल्हापूर:  पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट मिळण्याची सुविधा

देवेंद्र फडणवीसांच्या पाच आयडिया योगी आदित्यनाथांनी मागवल्या
देवेंद्र फडणवीसांच्या पाच आयडिया योगी आदित्यनाथांनी मागवल्या

मुंबई : देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2017

फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, आमदारांचं निलंबन मागे घेणार, 29 मार्चला 12

नोटा बदली प्रकरणाची चौकशी थेट जळगाव जिल्हा परिषदेच्या दारात
नोटा बदली प्रकरणाची चौकशी थेट जळगाव जिल्हा परिषदेच्या दारात

जळगाव : नोटाबंदीच्या काळात जळगावातील जिल्हा सहकारी बँकेच्या चोपडा

नागपुरात अकाऊंट्स अधिकाऱ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत
नागपुरात अकाऊंट्स अधिकाऱ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत

नागपूर : नागपुरात एका प्रशिक्षणार्थी डिव्हिजनल अकाऊंट्स

दोन टप्प्यात 19 आमदारांचं निलंबन मागे घेणार : सूत्र
दोन टप्प्यात 19 आमदारांचं निलंबन मागे घेणार : सूत्र

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन रद्द

डब्बा ट्रेडिंगवर छापे मारा आणि शेतकऱ्यांचे कर्ज फेडा:  नितेश राणे
डब्बा ट्रेडिंगवर छापे मारा आणि शेतकऱ्यांचे कर्ज फेडा: नितेश राणे

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे असेल तर राज्य

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, परीक्षेची चुकीची उत्तरपत्रिका अपलोड
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, परीक्षेची चुकीची उत्तरपत्रिका अपलोड

नागपूर: एका पदभरतीच्या परीक्षेची मॉडेल उत्तरपत्रिका म्हणून आरोग्य