शरद पवारांकडून खास शैलीत अजित पवारांचं कौतुक!

‘अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केलेल्या विकासाची दबक्या आवाजात चर्चा सुरू असते’ अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांची कौतुक केलं.

शरद पवारांकडून खास शैलीत अजित पवारांचं कौतुक!

पिंपरी-चिंचवड : ‘अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केलेल्या विकासाची दबक्या आवाजात चर्चा सुरू असते’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांवर कौतुक वर्षाव केला. अजित पवारांचं कौतुक करताना शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवरही टीका केली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सृजन पब्लिकेशन यांच्या वतीने आयोजित ‘पिंपरी- चिंचवड अचिव्हर्स’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व गौरव कार्यक्रमात पवार काल (रविवार) बोलत होते.

यावेळी शून्यातून आपलं विश्व निर्माण करणाऱ्या  पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांचा पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अनेक पत्रकारांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV