पुण्यात स्मृती इराणी आणि तुषार गांधी यांची जुगलबंदी

पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आठव्या 'भारतीय छात्र संसदचं' आयोजन करण्यात आलं आहे.

पुण्यात स्मृती इराणी आणि तुषार गांधी यांची जुगलबंदी

पुणे : पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आठव्या 'भारतीय छात्र संसदचं' आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 'डेमोक्रसी ब्लॅक ऑर व्हाईट' या विषयावर परिसंवादात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्यात शाब्दिक चकमक उपस्थितांना पाहायला मिळाली.

लोकशाहीविषयी बोलताना, ''जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, उमर खालिद यांना देशद्रोही म्हणणं योग्य नाही. ते आपली लोकशाही खऱ्या अर्थाने समृद्ध करत आहेत'', असं तुषार गांधी यांनी सांगितलं. त्याचसोबत नेत्याने सदैव विनम्र असावं असंही ते म्हणाले.

तुषार गांधी यांच्या व्यक्तव्यामुळे चिडलेल्या स्मृती इराणी यांनी त्यांच्या भाषणाच्याच सुरुवातीला प्रत्युत्तर दिलं. ''मी भारत माता की जय गर्वाने म्हणते म्हणून मला अँटी नॅशनल म्हटलं गेलं होतं. आधी भाषण करणाऱ्या मुलांना तुम्ही मिमिक्री आर्टिस्ट म्हटलं (त्यांनी सर्व मुद्दे सरकारच्या बाजूचे मांडले होते) ते त्यांनी विनम्रतेने स्वीकारलं. ही खरी लोकशाही आहे,'' असं स्मृती इराणी म्हणाल्या.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Smriti irani and tushar gandhi in MIT college programme
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV