पिंपरीमध्ये विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यात उज्वल उमेश शहा या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पिंपरीमध्ये विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी-चिंचवड : पुण्याच्या कोथरूड मधील MIT महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

उज्वल उमेश शहा असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थांचे नाव असून तो मूळचा दिल्लीचा असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. इंजिनिअरिंगच्या वर्गात त्याला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी तो पुण्यात आला होता.

काल (मंगळवार) पिंपरी चिंचवड मधील नेहरूनगर येथे राहणाऱ्या मित्राकडे तो आला होता. मित्र कॉलेजला गेल्यानंतर त्याच्या रूममध्ये छताच्या हुकला गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली. दरम्यान, त्याच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV