आईचं गर्भाशय मुलीला, पुण्यात प्रत्यरोपणाची तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी

बेळगावमधली 28 वर्षीय महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या आईने दान केलेलं गर्भाशय तिच्या शरिरामध्ये प्रत्यारोपित करण्यात आलं.

आईचं गर्भाशय मुलीला, पुण्यात प्रत्यरोपणाची तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे : पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात सलग तिसरी गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

बेळगावमधली 28 वर्षीय महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या आईने दान केलेलं गर्भाशय तिच्या शरिरामध्ये प्रत्यारोपित करण्यात आलं. या महिलेच्या 52 वर्षीय आईची मासिक पाळी मेनोपोजमुळे बंद झाली होती. औषधं देऊन ती मासिक पाळी सुरु करण्यात आली आणि त्यानंतर गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आलं.

दरम्यान, मे महिन्यात देशात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया गॅलेक्सी केअर रुग्णालयात पार पडली होती. यावेळी दोन महिलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या दोघींवरही आयव्हीएफ पद्धतीचा वापर करण्यात आला असून येत्या पंधरवड्यात त्या प्रेग्नंट आहेत की नाही हे समजेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: successful uterus transplant in pune latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV