5 लाखात घराचं स्वप्न दाखवणाऱ्या बिल्डरवर फौजदारी कारवाईचे आदेश

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Tuesday, 19 April 2016 7:29 AM
5 लाखात घराचं स्वप्न दाखवणाऱ्या बिल्डरवर फौजदारी कारवाईचे आदेश

पुणे : पाच लाखात घराचं आमिष दाखवणाऱ्या मॅपल ग्रुपवर सरकारने कारवाईचा हातोडा उगारला आहे. मॅपल ग्रुप आणि त्यांचे सीईओ सचिन अग्रवाल यांच्यावर गुन्हेगारी कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

मात्र, त्याचवेळी जाहिरातीत झळकणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापटांना मात्र क्लीन चीट देण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांत स्वस्तातलं घर देण्याची योजना मॅपल ग्रुपने जाहीर केली. ज्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो झळकत होता.

फोटो : काय आहे पुण्यातील ‘5 लाखात आपलं घर’ योजना?

दरम्यान, “जाहिरात देणाऱ्या बिल्डरचं नाव माहित नाही, बिल्डरला कधी भेटलो नाही. जाहिरातीसाठी माझी परवानगी नव्हती. पुणेकरांचं कुठलंही नुकसान होऊ देणार नाही.” असं स्पष्टीकरण गिरीश बापट यांनी दिलं आहे.

काय आहेआपलं घर‘  योजना?

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या अवतीभवती 5 लाखांमध्ये ‘आपलं घर’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 10 हजार लोकांनी नोंदणी केल्याचं कळतं.

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ही योजना राबवण्यात आल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. त्यासाठी प्रत्येक अर्जदाराकडून 1 हजार 150 रुपये अनामत रक्कम परत न देण्याच्या अटीवर भरुन घेण्यात आली आहे.

जे अर्जदार पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना 5 लाखात आणि जे ठरणार नाहीत, त्यांना साडे सात लाखामध्ये वन बीएचके फ्लॅट मिळेल अशी जाहिरात करण्यात आली आहे. अर्थात, त्याआधी लॉटरीसुद्धा काढली जाणार आहे.

संबंधित बातमी :

‘आपलं घर’चा केंद्र आणि राज्य सरकारशी संबंध नाही : प्रकाश मेहता

पुण्यातील ‘5 लाखात आपले घर’ योजनेवर सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

First Published: Monday, 18 April 2016 8:18 PM

Related Stories

नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष
नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष

मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुणे

निष्काळजी बाईकस्वारीमुळे पडून आईचा मृत्यू, पुण्यात मुलावर गुन्हा
निष्काळजी बाईकस्वारीमुळे पडून आईचा मृत्यू, पुण्यात मुलावर गुन्हा

पुणे : निष्काळजीपणे बाईक चालवल्यामुळे त्यावरुन पडून आईचा मृत्यू

पुण्यात मत्सरापोटी काकीकडून पाच वर्षांच्या पुतण्याची हत्या
पुण्यात मत्सरापोटी काकीकडून पाच वर्षांच्या पुतण्याची हत्या

पुणे : आपल्याला मुलीच आहेत, मात्र धाकट्या जावेला मुलगा असल्याच्या

पुण्यात स्वाईन फ्लूबाबत महापालिकेकडून हाय अलर्ट
पुण्यात स्वाईन फ्लूबाबत महापालिकेकडून हाय अलर्ट

पुणे : गेले काही वर्षे पुणे आणि स्वाईन फ्लू हे जणू समीकरणच झालं आहे.

झिंगाट, सैराट, आर्ची-परशा कळले, पण प्रबोधन झालं नाही : नागराज मंजुळे
झिंगाट, सैराट, आर्ची-परशा कळले, पण प्रबोधन झालं नाही : नागराज मंजुळे

पिंपरी चिंचवड : ‘सैराट’ सिनेमाने लोकांच्या मनावर अधिराज्य जरी

1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोल 18 टक्क्यांनी महागणार
1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोल 18 टक्क्यांनी महागणार

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल तब्बल 18 टक्क्यांनी

इजेनंतर रक्तस्राव सुरुच, हिमोफिलियाच्या लसीची महाराष्ट्रात तूट
इजेनंतर रक्तस्राव सुरुच, हिमोफिलियाच्या लसीची महाराष्ट्रात तूट

पुणे : शरीराला इजा झाली आणि कित्येक दिवस रक्तस्त्राव थांबलाच नाही,

पुण्यातील टेमघर धरणाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात
पुण्यातील टेमघर धरणाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाची दुरूस्ती

पिंपरीत 21 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरीत 21 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये 21 वर्षीय विद्यार्थ्यांने गळफास

पुण्याच्या भारती विद्यापीठातील मेडिकलच्या विद्यार्थिनीचा गळफास
पुण्याच्या भारती विद्यापीठातील मेडिकलच्या विद्यार्थिनीचा गळफास

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठात शिकणाऱ्या मेडिकलच्या