पुण्यात तृतीयपंथीयांच्या पहिल्या मठाची स्थापना

पुण्यातील गणेशपेठेत तृतीयपंथीयांचा मठ उभारण्यात आला असून, तृतीयपंथीयांनी काल लक्ष्मीपूजनादिवशी मठात गृहप्रवेश केला. या मठात अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध आहेत.

पुण्यात तृतीयपंथीयांच्या पहिल्या मठाची स्थापना

पुणे : दिवाळीच्या मुहूर्तावर पुण्यात तृतीयपंथीयांनी आपल्या नव्या मठात प्रवेश केला. पुण्यातील गणेशपेठेत हा मठ उभारण्यात आला असून, तृतीयपंथीयांनी काल लक्ष्मीपूजनादिवशी मठात गृहप्रवेश केला.

शहराचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गणेशपेठेत तृतीयपंथीयांनी एकत्रित येऊन एक मठवजा घर बांधलं होतं. मात्र, गेली अनेक दशके या जुन्या घरात गरजेच्या अनेक सोईसुविधा अपुऱ्या पडू लागल्या. त्यातच परिवारातील व्यक्तींचा संख्याही वाढली.

सध्या या परिवारातील सदस्यांची संख्या 40 च्या वर आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून शासनाच्या अनुदानाशिवाय आपल्या घर वजा मठाचा कायापालट केला.

एका सूसज्ज इमारतीसह या मठात वाय-फाय इंटरनेटसह अनेक अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

काल लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तृतीयपंथीयांनी मठात गृहप्रवेश करुन लक्ष्मीपूजन केलं. यापुढे या मठात वृद्ध आणि वंचित तृतीयपंथीयांना आश्रय दिला जाणार आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV