ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रेंच्या बंगल्यात चोरी

theft in renowned singer prabha atrey in pune latest updates

पुणे : ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या बंगल्यात चोरी झाली आहे. जंगली महाराज रस्त्यावरीस प्रभा अत्रेंच्या स्वरमयी गुरुकुल बंगल्यात शनिवारी पहाटे चोरी झाली. प्रभा अत्रे या काल पहाटे रियाज करित असताना हा प्रकार घडला आहे.

जंगली महाराज रस्त्यावरील शिवसागर हॉटेल मागील बाजूस स्वरमयी गुरुकुल या बंगल्यात प्रभा अत्रे राहातात. शनिवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे रियाज करत होत्या. यावेळी त्यांचे 3 मोबाईल आणि 2 हार्ड डिस्कची चोरी झाली. यावेळी त्यांच्या घरामध्ये एक विद्यार्थिनी आणि त्यांचा भाचा होता.

रियाज करताना प्रभा अत्रेंना कुणाचीतरी चाहूल जाणवली. मात्र घरातील कोणी असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. मात्र थोड्या वेळाने पाहिल्यावर हॉलमधील 3 मोबाईल आणि 2 हार्ड डिस्क नसल्याचं त्यांना दिसून आलं. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेबाबत बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रीकरण पाहण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

First Published:

Related Stories

सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी, राजू शेट्टींचा अल्टिमेटम
सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी, राजू शेट्टींचा अल्टिमेटम

पुणे : सदाभाऊ खोत यांच्याबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक

‘स्वाभिमानी’चे तुपकर सत्तेतून बाहेर पडण्यास तयार, सदाभाऊंचं काय?
‘स्वाभिमानी’चे तुपकर सत्तेतून बाहेर पडण्यास तयार, सदाभाऊंचं काय?

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात सुरु असलेल्या राज्य

सैराट फेम आर्ची 10 वीनंतर पुढचं शिक्षण पुण्यातच घेणार!
सैराट फेम आर्ची 10 वीनंतर पुढचं शिक्षण पुण्यातच घेणार!

पुणे : सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू 10 वीनंतर पुढचं शिक्षण

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही : शरद पवार
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही : शरद पवार

पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी

पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था
पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था

पुणे : पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्या पावसात बिकट अवस्था झाली

पुण्यात पोलीस स्टेशनच्या कोठडीतच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
पुण्यात पोलीस स्टेशनच्या कोठडीतच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पुण्याच्या देहू रोडच्या पोलिस स्टेशनमध्ये कोठडीतच एका

पिंपरीमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
पिंपरीमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

पिंपरी : पिंपळे गुरवमध्ये योगेश शेलार या बांधकाम व्यावसायिकावर

'नीट'मध्ये पुण्याचा अभिषेक राज्यात अव्वल, देशात पाचवा
'नीट'मध्ये पुण्याचा अभिषेक राज्यात अव्वल, देशात पाचवा

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)

पुण्यात नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका: हायकोर्ट
पुण्यात नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका: हायकोर्ट

मुंबई:  पुण्यात बाणेर आणि बालेवाडी परिसरात नवीन बांधकामांना

स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यातील यादी जाहीर, पिंपरी-चिंचवडचा समावेश
स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यातील यादी जाहीर, पिंपरी-चिंचवडचा...

नवी दिल्ली: केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून स्मार्ट सिटींच्या