जेजुरीजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला टँकरची धडक, 4 ऊसतोड मजुरांचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड कामगार सातारा जिल्ह्यातील लोणंदमध्ये ऊसतोडीसाठी आले होते.

जेजुरीजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला टँकरची धडक, 4 ऊसतोड मजुरांचा मृत्यू

पुणे : ट्रॅक्टर ट्रॉली आणि टँकरच्या अपघातात चार ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जेजुरी जवळील पिंपरे गावच्या हद्दीतील ही घटना आहे. एकूण 9 जण आणखी जखमी असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड कामगार सातारा जिल्ह्यातील लोणंदमध्ये ऊसतोडीसाठी आले होते. मात्र आज मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर जेजुरी गडावर दर्शनासाठी जाताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

मकरसंक्रांतीनिमित्त हे सर्व ऊसतोड मजूर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून जेजुरीला जात होते. दर्शन घेऊन परतत असताना या ट्रॉलीला टँकरने धडक दिली, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: tractor trolley and tanker accident near Jejuri 4 died
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV