डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्म 1 वरुन सोडा, पुण्यात प्रवाशांनी गाडी रोखली

travellers of deccan queen did rail roko in pune latest updates

पुणे : पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज सकाळी जवळपास तासभर प्रवाशांनी रोखून धरली. पूर्वी ही ट्रेन प्लॅटफॉर्म 1 वरून सुटायची. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही ट्रेन प्लॅटफॉर्म 5 वरुन सोडण्यात येत होती. त्यामुळे ती पूर्वीप्रमाणेच 1 वरुन सोडण्यात यावी यासाठी मासिक पासधारक प्रवाशांनी आंदोलन केलं.

पुण्याहून मुंबईसाठी दररोज सकाळी 7.15 वाजता धावणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरुन सुटायची. प्लॅटफॉर्म 1 हा एन्ट्री गेटच्याजवळ आहे, त्यामुऴे ट्रेन पकडणं प्रवाशांना सोयीस्कर होतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरुन सोडली जात होती. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचा वापर प्रवाशांना करावा लागत होता. तसंच पुलावरील गर्दीमुळे अनेकांना गाडीही चुकत होती. ही ट्रेन पूर्वीप्रमाणे 1 वरुन सोडावी यासाठी मासिक पास धारक प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे वारंवार पाठपुरावाही केला होता. त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे आज प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली.

सकाळच्या वेळी मासिक पासधारकांनी डेक्कन क्वीन ट्रेन रोखून धरल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. सकाळी 7.15 वाजता सुटणारी डेक्कन क्वीन तासाभरानंतर सोडण्यात आली. रविवारच्या सुट्टीनंतर मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आज गैरसोय झाली.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:travellers of deccan queen did rail roko in pune latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

बीडमध्ये आरोपी रमेश कदमांची खास बडदास्त
बीडमध्ये आरोपी रमेश कदमांची खास बडदास्त

बीड : अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सध्या

'देवदूत' ठरणारा व्हॉट्सअप ग्रुप!
'देवदूत' ठरणारा व्हॉट्सअप ग्रुप!

खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एखादा अपघात झाल्याची माहिती

नागपुरात शेतकऱ्यांना महाबीजचा शॉक, सोयाबीनचं बियाणं बोगस
नागपुरात शेतकऱ्यांना महाबीजचा शॉक, सोयाबीनचं बियाणं बोगस

नागपूर : अस्मानी संकटानं खचलेल्या शेतकऱ्यांवर आता सुलतानी संकट

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/07/2017   पावसाचा जोर आणखी वाढण्याचा

मीच तो पाहुणा, बनाव रचून दोघा भामट्यांचा कारसह पोबारा
मीच तो पाहुणा, बनाव रचून दोघा भामट्यांचा कारसह पोबारा

नागपूर : ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातल्या एका सीनसारखी घटना

मुंबई- गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु
मुंबई- गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळ परशुराम घाटात रस्त्यावर

उदयनराजेंना अटक होण्याची शक्यता, हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
उदयनराजेंना अटक होण्याची शक्यता, हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व

दुष्काळी मराठवाड्यात 500 कोटींची अघोषित संपत्ती
दुष्काळी मराठवाड्यात 500 कोटींची अघोषित संपत्ती

औरंगाबाद: अघोषित संपत्तीची घोषणा अर्थात इन्कम डिक्लेरेशन स्कीम

राज्यभरात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज
राज्यभरात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज

मुंबई : मुंबईसह कोकणात सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम असतानाच, येत्या

सोलापुरात काळवीटावर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार
सोलापुरात काळवीटावर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार

सोलापूर : माढा तालुक्यातील अरण-पडसाळी रस्त्यावरील अरण हद्दीतील