पिंपरीत तुकाराम मुंढे आणि राजकारणी पुन्हा आमनेसामने

पिंपरीत तुकाराम मुंढे आणि राजकारणी पुन्हा आमनेसामने

पिंपरी : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राहिलेले तुकाराम मुंढे आता पुण्यातही चर्चेत आहेत. पुणे महानगर परिवहन मंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली.

पुण्याच्या स्वारगेटमधील कार्यालयातील बैठकीत हा वाद झाला. पिंपरी चिंचवड शहरातल्या समस्या मांडताना आपापले मुद्दे मांडताना शाब्दिक चकमक उडाली.

दरम्यान वादावर पडदा टाकण्यासाठी तुकाराम मुंढेंनी माफी मागितल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळेंनी केला आहे. तर मुंढे पिंपरी चिंचवड मध्ये आल्यानंतरच PMPML ला दीडशे कोटींचा निधी पालिका देईल, अशी ठाम भूमिका सावळे यांनी मांडली. आणि यावरूनच वादाची ठिणगी पेटली.

कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. मात्र राजकारण्यांसोबत त्यांचे अनेकदा खटके उडाल्याचं समोर आलं आहे. तुकाराम मुंढे यांची नवी मुंबईतील कारकीर्दही चांगलीच गाजली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात आणि पिंपरीत तुकाराम मुंढे आणि राजकारण्यांमध्ये संघर्ष समोर आला आहे.

संबंधित बातम्या :

तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे PMPMLच्या ब्रेकडाऊनमध्ये 35 टक्क्यांची घट


PMPML कामगारांचा ओव्हरटाईम बंद, तुकाराम मुंढेंचा आणखी एक निर्णय


PMPML च्या 27 मार्गांवरील फेऱ्या बंद, तुकाराम मुंढेंचा निर्णय


तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीच्या कारभाराचा पुण्याच्या महापौरांना झटका !


ऑन ड्युटी झोपलेल्या 9 कर्मचाऱ्यांचं निलंबन, तुकाराम मुंढेंचे आदेश


120 लेटकमर्सना आजचा पगार नाही, तुकाराम मुंढेंचा बडगा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV