पुुण्यात रस्ता ओलांडताना कारची धडक, दोन मुलांचा मृत्यू

By: मिकी घई, एबीपी माझा, पुणे | Last Updated: Monday, 17 April 2017 6:12 PM
पुुण्यात रस्ता ओलांडताना कारची धडक, दोन मुलांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील बाणेरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दोन मुलांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. दोनही मुलं आईसोबत डी मार्टमधून खरेदी करुन घरी परतत होते. रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या तिघांना कारनं धडक दिली.

आज दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होते. रस्ता ओलांडताना गाड्यांची रहदारी सुरु असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीनं त्यांना धडक दिली. या दुर्घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलांची आई गंभीर जखमी झाली आहे.

मुलांना धडक देणारी गाडी एक महिला चालवत होती. ही महिला पुण्याहून बालेवाडीच्या दिशेनं जात होती. बाणेरमध्ये आल्यावर तीचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तीनं दुभाजकावरील तिघांना जोरदार धडक दिली. ती एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे. अपघातात चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे. अद्याप पोलिसांनी या महिलेला अटक केलेली नाही.

व्हिडीओ

First Published: Monday, 17 April 2017 4:42 PM

Related Stories

दोन्ही बाजूंनी एव्हरेस्टची चढाई पूर्ण, किशोर धनकुडेंचा विक्रम
दोन्ही बाजूंनी एव्हरेस्टची चढाई पूर्ण, किशोर धनकुडेंचा विक्रम

पुणे : पुण्याच्या किशोर धनकुडेंनी जगातल्या सर्वात उंच अशा

बारावीची परीक्षा अवघड गेल्याने तरुणीची आत्महत्या
बारावीची परीक्षा अवघड गेल्याने तरुणीची आत्महत्या

पुणे : बारावीची परीक्षा अवघड गेल्याने पुण्यातील तरुणीने टोकाचं

वाहतूक नियम शिकवण्यासाठी पुण्यातील रस्त्यांवर थेट यमराज
वाहतूक नियम शिकवण्यासाठी पुण्यातील रस्त्यांवर थेट यमराज

पुणे : यमराजांचं राक्षसी हास्य चक्क पुण्यातल्या रस्त्यावर बघायला

पुण्यात प्रेयसीने प्रियकराच्या लग्नाचा मंडप जाळला
पुण्यात प्रेयसीने प्रियकराच्या लग्नाचा मंडप जाळला

पुणे : प्रियकर दुसऱ्याच मुलीशी लग्न करतोय, हे समजल्यानंतर प्रेयसीने

पुण्यात दारुबंदीवरुन महापौर आणि पालकमंत्री आमने-सामने
पुण्यात दारुबंदीवरुन महापौर आणि पालकमंत्री आमने-सामने

पुणे : पुण्यातल्या हायवेलगतच्या दारुबंदीवरुन महापौर मुक्ता टिळक

मुलीची छेड काढल्याच्या संशयातून पुण्यात दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड
मुलीची छेड काढल्याच्या संशयातून पुण्यात दोन अल्पवयीन मुलांची नग्न...

पुणे: मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजुतीतून, दोन अल्पवयीन मुलांची

रिक्षावाल्याचा प्रमाणिकपणा, साडे तीन लाखांचे दागिने परत केले!
रिक्षावाल्याचा प्रमाणिकपणा, साडे तीन लाखांचे दागिने परत केले!

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील देहू रोडमध्ये रिक्षावाल्याच्या

पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर देशातलं पहिलं गर्भाशय ट्रान्सप्लांट
पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर देशातलं पहिलं गर्भाशय ट्रान्सप्लांट

पुणे : देशातलं पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात होत आहे.

पुण्यात पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या
पुण्यात पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे: पुण्यातील तळेगावमधील एका पोलीस हवालदारानं गळफास घेऊन

पुण्यात आयटी इंजिनिअर्सच्या आत्महत्या का वाढल्या आहेत?
पुण्यात आयटी इंजिनिअर्सच्या आत्महत्या का वाढल्या आहेत?

पुणे: पुण्यात सध्या आयटी इंजिनिअरच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं