मुलीची छेड काढल्याच्या संशयातून पुण्यात दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड

मुलीची छेड काढल्याच्या संशयातून पुण्यात दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड

पुणे: मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजुतीतून, दोन अल्पवयीन मुलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कर्वेनगरमध्ये घडला आहे. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, मुलीचे वडील आणि भावासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलगा आणि आरोपीची मुलगी एकाच शाळेत शिकतात.  मुलाकडून मुलीची छेड काढली जाते असा संशय मुलीच्या वडिलांना संशय होता. त्या संशयातून त्यानं 4 ते 5 जणांच्या जमावासह मुलाला आणि त्याच्या मित्राला गाठलं आणि त्यांना बेदम मारहाण केली.

तेवढ्यानं मन न भरल्यानं मुलांचे कपडे काढून त्यांची नग्नावस्थेत धिंडही काढण्यात आली. या घटनेनंतर पीडित मुलाच्या आईनं वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV