शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्ण पदक मिळणार, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावानं सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यात केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट त्यात आहे.

शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्ण पदक मिळणार, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा

पुणे : तुम्ही शाकाहारी असाल तरच तुम्हाला पुणे विद्यापीठात सुवर्णपदक मिळू शकतं. कारण तसा अजब फतवाच पुणे विद्यापीठानं काढला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावानं सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट त्यात आहे. पत्रकात अटींची मोठी जंत्रीच देण्यात आली आहे. विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थी या पदकासाठी पात्र असेल. १५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत.

pune-

विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा त्यातही ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा. अशी अजब अट यामध्ये देण्यात आली आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Vegetarian student will get gold medal Pune University Condition
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV