व्हायरल सत्य : बाणेर अपघातातील आरोपी सुशीलकुमार शिंदेंची कन्या?

व्हायरल सत्य : बाणेर अपघातातील आरोपी सुशीलकुमार शिंदेंची कन्या?

मुंबई : काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका महिला चालकाने बेदरकारपणे गाडी चालवून रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकावर उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडलं होतं. त्यानंतर आरोपी महिला ही माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या असल्याच्या चर्चांना उधाण आलं. सोशल मीडियावरुन ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली.

बाणेरमधील या अपघातात मायलेकीचा मृत्यू होऊनही सुरुवातीला आरोपी महिला चालक सुजाता श्रॉफवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. त्यामुळे यामागे बड्या असामीचा हात असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. कुठलीही तथ्य तपासून न
पाहता आरोपी सुशीलकुमार शिंदेंची द्वितीय कन्या प्रिती श्रॉफ यांनी हा अपघात घडवल्याचं म्हटलं जात होतं.

बाणेर परिसरात बेदरकारपणे कार चालवत पाच जणांना चिरडणाऱ्या सुजाता श्रॉफविरोधात अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. याआधी पोलिसांनी केवळ निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि अपघातानंतर निघून जाणे या कलमांअंतर्गत मंगळवारी अटक केली होती. काही वेळातच या महिलेला जामीनही मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका होऊ लागली होती.

आरोपी सुजाता श्रॉफचं सुशीलकुमार शिंदे यांच्याशी कुठलंही नातं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केवळ शिंदे यांची कन्या प्रिती यांचं आडनाव श्रॉफ असल्यामुळे दोघींचा संबंध जोडला जात असल्याचं समोर आलं आहे. व्हायरल झालेल्या पोस्ट्समुळे सुशीलकुमार शिंदे आणि श्रॉफ कुटुंबीयांना हकनाक बदनामी आणि मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

आरोपी सुजाता जयप्रकाश श्रॉफ ही महिला स्थानिक रिअल इस्टेट व्यावसायिकाची पत्नी आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रिती या मुंबईतील व्यावसायिक आणि काँग्रेस नेते राज श्रॉफ यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. पुण्याच्या बाणेर अपघातातील आरोपी ही सुशीलकुमार शिंदेंची कन्या असल्याची व्हायरल पोस्ट खोटी आहे.

17 एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही चिमुरडी पूजा विश्वकर्मांसोबत डी मार्टमधून घरी परतत होती. रस्ता ओलांडताना गाड्यांची रहदारी सुरु असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीने त्यांना धडक दिली. दुर्घटनेत इशिताचा जागीच मृत्यू झाला, तर तिची आई पूजा विश्वकर्मा यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरोपी सुजाता श्रॉफ पुण्याहून बालेवाडीच्या दिशेनं जात होती. बाणेरमध्ये आल्यावर तिचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तिनं दुभाजकावरील पाच जणांना जोरदार धडक दिली.

संबंधित बातम्या :


बाणेर अपघात प्रकरण : महिला चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा


बाणेर अपघात : दोघांचा बळी घेऊनही महिला चालकाला काही तासात जामीन


बाणेर अपघात : लेकीनंतर आईचाही मृत्यू, बेजबाबदार महिला चालक अटकेत


पुुण्यात रस्ता ओलांडताना कारची धडक, दोन मुलांचा मृत्यू

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV