चिंचवडमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलाची हत्या

चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजसमोर झालेल्या वादातून दोन अज्ञातांनी मारहाण केली आणि आदित्यला मोशी येथील श्री हॉस्पिटलमध्ये सोडून गेले.

चिंचवडमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलाची हत्या

पिंपरी चिंचवड : निगडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. आदित्य जैद असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. निगडी पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल रंजना जैद यांचा तो मुलगा आहे.

चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजसमोर झालेल्या वादातून दोन अज्ञातांनी मारहाण केली आणि आदित्यला मोशी येथील श्री हॉस्पिटलमध्ये सोडून गेले. रुग्णालयात सोडण्यात आलं तेव्हा आदित्य मृतावस्थेत होता.

भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत. श्री हॉस्पिटलमध्ये सायंकाळी 6 वाजता आदित्यला मृत घोषित करण्यात आलं. चिंचवडच्या मोहन नगरमधील अक्षय मोरे आणि धिरज थीटे या तरुणांनी आदित्यला मारहाण केली होती.

काय आहे प्रकरण?

आदित्य जैद हत्येप्रकरणी अक्षय मोरेसह निलेश गायकवाडला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आणखी एकाचा शोध सुरु आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.

अक्षय आणि एका मुलीचे प्रेमसंबंध होते. त्याच मुलीसोबत आदित्यचेही प्रेमसंबंध जुळले. आज सकाळी आदित्य त्याच मुलीच्या घरी भेटायला गेला तेव्हा अक्षयचा त्या मुलीने फोन उचलला नाही. म्हणून अक्षय थेट घरी आला. अक्षयने आदित्य आणि प्रेयसीला मारहाण केली. त्यानंतर प्रेयसीला तालेरा रुग्णालयात तर आदित्यला त्रिवेणीनगर येथील मित्राच्या घरी ठेवलं.

इतकं होऊनही आदित्यने त्या मुलीला मेसेज सुरु ठेवले. अक्षयने या रागातून आदित्यला लाकडी दांडक्याने मारहाण केली. याच मारहाणीत आदित्यचा मृत्यू झाला. त्यानंतर आदित्यचा मृतदेह मोशी येथील श्री रुग्णालयात सोडण्यात आला. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV