फोटो काढण्याच्या नादात पवना धरणात दोघे बुडाले

फोटो काढण्याच्या नादात दोघेजण बुडाल्याची घटना पुण्यातल्या पवना धरणात घडली आहे. कासारसाई बॅकवॉटरमध्ये हा प्रकार घडला असून एकाचा मृतदेह हाती लागला आहे.

फोटो काढण्याच्या नादात पवना धरणात दोघे बुडाले

पिंपरी :  फोटो काढण्याच्या नादात दोघेजण बुडाल्याची घटना पुण्यातल्या पवना धरणात घडली आहे. कासारसाई बॅकवॉटरमध्ये हा प्रकार घडला असून एकाचा मृतदेह हाती लागला आहे.

आज रविवारी सकाळी पुण्यातल्या 9 मुलांचा गृप फिरण्यासाठी पवना धरणाजवळच्या कासारसाईमध्ये गेला होता. तेव्हा काही जण फोटो काढण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. पण त्यातल्या एकाला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने उडी मारली, पण दुर्दैवाने तोही बुडाला. त्या पाठोपाठ आणखी दोघांनी उड्या मारल्या. पण त्या दोघांना स्थानिकांनी वाचवलं.

बुडालेल्या तरुणांपैकी एकाचे नाव वेदप्रकाश राणा आणि दुसऱ्याचे मोहित जाधव असं नाव आहे. दोघे पुण्यात एका खाजगी कंपनीत कामाला होते.

दरम्यान या दुर्घटनेत बुडालेल्या एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध अजूनही सुरु आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळाकडे रवाना झालं आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: youth drown in pavana dam in pimpri latest mararthi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV