त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उत्साहाचं वातावरण - ABP Majha

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उत्साहाचं वातावरण

पुणे : शहरात आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सगळीकडे अतिशय उत्साहाचं वातावरण पहायला मिळतंय. त्रिपुरारी पौर्णिमेलाच दिव्यांची पौर्णिमा असंही म्हणतात.

कारण या दिवशी सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. पुण्यातल्या अनेक महत्त्वाच्या मंदीरांतून आज दिव्यांची आरास करण्यात आली.

पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदीर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालं आहे.

ओंकारेश्वर मंदीर हे पुण्यातलं पेशवेकालीन देवस्थान. दगडी बांधणीचं हे देवालय सुद्धा आज त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त दिव्यांच्या प्रकाशात सजलं आहे.

महालक्ष्मी मंदीरातही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त एकतीस हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.

Related Stories