ग्रामदेवता : आदिवासींचं कुलदैवत, बर्डीपाड्याची देवमोगरा देवी

Gramdevta : Nandurbar : Navapur’s Devmogara Devi

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या बर्डीपाडा इथली देवमोगरा देवी. विसरवाडी गावापासून 10 किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणी रस्ताही नाही अशा ठिकाणी हे देवमोगरा मातेचं मंदिर उंच डोगरावर वसलेलं आहे. पायथ्यापासून 2 हजार 640 फूट अंतर पार करुन दर्शनाला जावं लागतं.  मंदिराच्या पायथ्यापासून सुरु होणाऱ्या पायऱ्यांपासून केलेला  कच्चा रस्ता आहे. गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील देवमोगरा मातेची ही प्रतिकृती बर्डीपाडा येथे पाहायला मिळते. आदिवासी भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला साकडं घालण्यासाठी या ठिकाणी येतात. कणी पूजन करुन कोलपासानगरीमध्ये बाहागोर्‍या, सिडगोवा, दोघा वजीर, खेका पुंजारा टुडा, बोडवाबाबा हेगवा, बाबा डुंगो, बाबा ढोडगा, बाबा आथवा, बाबा रोज्या, बाबा हाटा, बाबा खोगज्या, जांबु गोड, बाहा आंबाडा या दाब मंडल शिवारातील देव देवतांचे पूजन करतात.

हे मंदिर जवळपास दीडशे वर्षांपूर्वीचं असल्याची आख्यायिका आहे. एका छोट्याशा घराप्रमाणे हे मंदिर पाहायला मिळतं. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातील मराठी माघ महिन्याच्या पौर्णिमेनंतर येणार्‍या अमावस्येला म्हणजे महाशिवरात्रीला देवमोगराच्या मोगीची यात्रा भरते. या यात्रेसाठी आदिवासी बांधव पंधरा दिवसांपासून तयारीला लागतात. याहा मोगी ही आदिवासी समाजाची कुलदेवता असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या चारही राज्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होतात.

Gramdevta_Nandurbar_Devmogara_Devi_1

देवमोगरा देवीच्या जन्माबाबत आदिवासी समाजात अनेक कथा सांगितल्या जातात. सातपुडयातील बागोर्‍या देवाच्या राज्यात बागोर्‍या देव जंगलात शिकारीला आणि कंदमुळे गोळा करायला गेले. तेव्हा त्यांना सिबलीच्या जाळीत बाबूंच्या जाळीत दाब गावाच्या गवतात एक लहान बाळ सापडलं. हे बाळ म्हणजे देवमोगरा देवी असं सांगितलं जातं. बागोर्‍या देवाने या बालिकेला आणून राणी देवी गांधार यांच्याकडे दिलं. त्याचवेळी त्यांच्याकडे एका मुलाचाही जन्म झाला होता. त्याचं नाव विन्या देव किंवा गांडा ठाकूर सांगितलं जातं आणि त्याला भाऊ म्हणून ओळखतात.

देवमोगरा देवी तरुण झाल्यावर तिचं राजापानठा देवाशी लग्न होतं. राजापांठाच्या आईचं नांव उमरावाणू आहे. देवमोगरा देवीच्या आदिवासी भाषेत याहामोगी म्हणतात याहा म्हणजे आई असा अर्थ आहे. महादुष्काळात याहामोगीच्या या उदात्त आणि मानवतादी कार्यामुळेच त्यांना याहा, लोकमाता, कणी, कन्सरी आपली सर्व पालनहार संबोधून दैवत्व बहाल केलं.

आदिवासी समाजाचे हे ग्रामदैवत असल्याने आजही इथल्या पूजा-विधी आदिवासी भाषेतच होतात. धान्य, वन भाजी, कोंबळा, भंगारची भाकर आणि मव्हाच मद्या (दारु) असा नैवेद्य देवीला दिला जातो. त्यामुळे आदिवासी भाषेतच मंदिराचे पुजारी देवीची महिती सांगतात.

पहाडात आणि दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या या देवीकडे जाण्याकरता भाविकांना खडतर प्रवास करावा लागतो. येथेही सरकारी यंत्रणेची उदासीनता पाहायला मिळते. नवापूरमध्ये ग्रामदैवत असल्याने मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग सुखकर व्हावा, अशीच अपेक्षा आदिवासी बांधव करत आहेत.

पाहा व्हिडीओ

Gramdevta News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Gramdevta : Nandurbar : Navapur’s Devmogara Devi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

ग्रामदेवता: औरंगाबादमधील कन्नड तालुक्याचे ग्रामदैवत कालीकामाता
ग्रामदेवता: औरंगाबादमधील कन्नड तालुक्याचे ग्रामदैवत कालीकामाता

औरंगाबाद: चाळीसगाव रस्त्यावरील उपळा गावात असलेलं कालीमातेचे मंदिर

ग्रामदेवता : अकोल्याच्या बार्शी टाकळीचं ग्रामदैवत श्री कालंका माता
ग्रामदेवता : अकोल्याच्या बार्शी टाकळीचं ग्रामदैवत श्री कालंका माता

अकोला : बार्शी टाकळी तालुक्याची आध्यात्मिक ओळख येथील दोन मंदिरांनी

ग्रामदेवता : औरंगाबादच्या लासूर गावचं ग्रामदैवत श्री दाक्षायणी देवी
ग्रामदेवता : औरंगाबादच्या लासूर गावचं ग्रामदैवत श्री दाक्षायणी...

औरंगाबाद : औरंगाबादच्या लासूर गावात शिवना नदीच्या काठावर

ग्रामदेवता : वर्ध्याच्या देवळीचं आराध्यदैवत मिरननाथ महाराज
ग्रामदेवता : वर्ध्याच्या देवळीचं आराध्यदैवत मिरननाथ महाराज

वर्धा : वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे

ग्रामदेवता : पुण्यातील चिंचवडचं ग्रामदैवत श्री मोरया गणपती
ग्रामदेवता : पुण्यातील चिंचवडचं ग्रामदैवत श्री मोरया गणपती

पुणे : पुणे जिल्ह्याचं आध्यात्मिक महत्व रांजणगाव, मोरगाव, थेऊर या

ग्रामदेवता : अकोल्याच्या बाळापूरचं आराध्यदैवत श्री बाळादेवी
ग्रामदेवता : अकोल्याच्या बाळापूरचं आराध्यदैवत श्री बाळादेवी

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

ग्रामदेवता : सोलापूरच्या मंगळवेढ्याचं ग्रामदैवत दामाजीपंत
ग्रामदेवता : सोलापूरच्या मंगळवेढ्याचं ग्रामदैवत दामाजीपंत

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा तालुका ज्वारीच कोठार

ग्रामदेवता : रायगडच्या खोपोलीचं ग्रामदैवत 'बोंबल्या विठोबा'
ग्रामदेवता : रायगडच्या खोपोलीचं ग्रामदैवत 'बोंबल्या विठोबा'

रायगड : रायगड जिल्ह्यातल्या खोपोली तालुक्याचं

ग्रामदेवता: गणपतीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी जालन्याचे राजूरेश्वर
ग्रामदेवता: गणपतीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी जालन्याचे...

जालना: जालना शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत

ग्रामदेवता: चंद्रपूरमधील भद्रावती तालुक्याचं ग्रामदैवत 'भद्रनाग'
ग्रामदेवता: चंद्रपूरमधील भद्रावती तालुक्याचं ग्रामदैवत 'भद्रनाग'

चंद्रपूर: नागपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्याचं ग्रावदैवत