यंदाच्या आयपीएल लिलावात या दिग्गज खेळाडूंवर नजर

भारतासह जगभरातील 1122 खेळाडू या लिलावात सहभागी होणार आहेत.

यंदाच्या आयपीएल लिलावात या दिग्गज खेळाडूंवर नजर

मुंबई : यंदाच्या आयपीएल मोसमासाठी होणाऱ्या लिलावात एकूण 1122 खेळाडूंवर बोली लावली जाईल. लिलावात आपल्या नावाचा समावेश करण्यासाठी 12 जानेवारी ही अखेरची तारीख होती. भारतासह जगभरातील 1122 खेळाडू या लिलावात सहभागी होणार आहेत.

विविध राष्ट्रीय संघातील 281 आणि 838 युवा खेळाडूंचा यात समावेश असेल, ज्यामध्ये भारतातील 778 युवा खेळाडू असतील, तर इतर देशांमधील तीन खेळाडू आहेत. 27 आणि 28 जानेवारीला बंगळुरुत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

गौतम गंभीर, युवराज सिंह, आर. अश्विन, हरभजन सिंह, अजिंक्य रहाणे, कुलदीप यादव आणि सलामीवीर जोडी केएल राहुल आणि मुरली विजय यांना आपल्या संघात घेण्यासाठी फ्रँचायझींची चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे स्फोटक फलंदाज ख्रिस गेल, बेन स्टोक्स, ख्रिस लीन, इयॉन मॉर्गन, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या परदेशी खेळाडूंवरही फ्रँचायझींची नजर असेल. गेल्या मोसमात बेन स्टोक्सने दमदार कामगिरी केली होती. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटही यंदाच्या लिलाव होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी असेल.

वेस्ट इंडिजचे ड्वेन ब्रॅव्हो, कार्लोस ब्रेथवेट, एव्हिन लुईस आणि जेसन होल्डर यांच्यासाठीही रस्सीखेच असेल. तर श्रीलंकेचे लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला आणि थिसारा परेरा यांचंही लिलाव होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नाव आहे.

लिलावात कोणत्या देशाचे किती खेळाडू?

 • अफगाणिस्तान 13

 • ऑस्ट्रेलिया 58

 • बांगलादेश 8

 • इंग्लंड 26

 • आयर्लंड 2

 • न्यूझीलंड 30

 • स्कॉटलंड 1

 • दक्षिण आफ्रिका 57

 • श्रीलंका 39

 • यूएसए 2

 • वेस्ट इंडिज 39

 • झिम्बाम्ब्वे

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 1122 players sign up vivo ipl player auction 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV