2007 विश्वचषक हा फार वाईट काळ होता : सचिन

'मला वाटतं की, 2006-07 हा काळ संघासाठी फारच वाईट होता. आम्ही विश्वचषकातील सुपर 8 फेरीतही प्रवेश करु शकलो नाही. पण तिथूनच आमचा खरा प्रवास सुरु झाला.'

By: | Last Updated: > Wednesday, 13 September 2017 11:12 AM
2007 world cup was the lowest for indian cricket said sachin tendulkar latest update

मुंबई : 2007चा विश्वचषक हा भारतीय संघासाठी अत्यंत वाईट काळ होता. असं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलं आहे. 2007च्या विश्वचषकात पहिल्याच फेरीत बाहेर पडल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळाले. असंही सचिन म्हणाला. तो एका कार्यक्रमात बोलत होता.

यावेळी बोलताना सचिन म्हणाला की, ‘मला वाटतं की, 2006-07 हा काळ संघासाठी फारच वाईट होता. आम्ही विश्वचषकातील सुपर 8 फेरीतही प्रवेश करु शकलो नाही. पण तिथूनच आमचा खरा प्रवास सुरु झाला. नव्या पद्धतीनं विचार करणं आम्ही सुरु केलं आणि त्या दिशेनं विचार करु लागलो.’

राहुल द्रविडच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ त्यावेळी श्रीलंका आणि बांगलादेशकडून पराभूत होऊन पहिल्याच फेरीत बाद झाला होता.

‘या विश्वचषकानंतर आम्हाला बरेच बदल करावे लागले. त्यानंतर आम्ही जोमानं कामाला लागलो आणि त्याचे चांगले परिणामही आम्हाला दिसू लागले.’ असंही तेंडुलकर म्हणाला.

‘आम्हाला अनेक बदल करावे लागले. तेव्हा हे बदल योग्य आहेत की अयोग्य हे आम्हाला माहित नव्हतं. त्यासाठी आम्हाला बरीच वाट पाहावी लागली. विश्वचषकाची ट्रॉफी उचलण्यासाठी मला 21 वर्ष वाट पाहावी लागली.’ असंही सचिन यावेळी म्हणाला.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2011 साली भारतानं विश्वचषक पटकावला. यावेळी भारतीय संघात तेंडुलकरची भूमिका महत्त्वाची होती.

 

 

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:2007 world cup was the lowest for indian cricket said sachin tendulkar latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

कोलकाता : विराट कोहलीच्या टीम इंडियाने कोलकात्याच्या दुसऱ्या वन

भारताच्या ‘चायनामन’ची ऑस्ट्रेलियाविरोधात हॅटट्रिक
भारताच्या ‘चायनामन’ची ऑस्ट्रेलियाविरोधात हॅटट्रिक

कोलकाता : भारताच्या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं कोलकात्याच्या

#IndVsAus : कोलकाता वनडेत भारताचं ऑस्ट्रेलियाला 253 धावांचं आव्हान
#IndVsAus : कोलकाता वनडेत भारताचं ऑस्ट्रेलियाला 253 धावांचं आव्हान

कोलकाता : टीम इंडियानं कोलकात्याच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाला

मला पुरुष म्हणून हिणवायचे, सेरेनाचं आईला भावनिक पत्र
मला पुरुष म्हणून हिणवायचे, सेरेनाचं आईला भावनिक पत्र

मुंबई : टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने तिच्या आईला लिहिलेलं

‘महेंद्रसिंह धोनी 2023चा विश्वचषक देखील खेळेल’
‘महेंद्रसिंह धोनी 2023चा विश्वचषक देखील खेळेल’

मुंबई : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या

 कपिल देव, द्रविडसह या क्रिकेटर्सचा आतापर्यंत 'पद्मभूषण'ने सन्मान
कपिल देव, द्रविडसह या क्रिकेटर्सचा आतापर्यंत 'पद्मभूषण'ने सन्मान

नवी दिल्ली : ‘पद्मभूषण’ सन्मानासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी

माझ्या गोलंदाजीवर खेळताना वॉर्नर दबावात होता : कुलदीप यादव
माझ्या गोलंदाजीवर खेळताना वॉर्नर दबावात होता : कुलदीप यादव

कोलकाता : टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची

भारत आणि ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या वन डेसाठी ईडन गार्डन्स सज्ज
भारत आणि ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या वन डेसाठी ईडन गार्डन्स सज्ज

कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला दुसरा वन डे सामना उद्या

'पद्मभूषण'साठी महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस
'पद्मभूषण'साठी महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस

मुंबई : ‘पद्मभूषण’ सन्मानासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी

इंग्लंडची विंडीजवर मात, श्रीलंका थेट विश्वचषक 2019 साठी पात्र
इंग्लंडची विंडीजवर मात, श्रीलंका थेट विश्वचषक 2019 साठी पात्र

मुंबई : 2019 च्या क्रिकेट विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणारा श्रीलंका हा