संपूर्ण कारकीर्दीत एकही नो बॉल न टाकणारे 5 गोलंदाज

गोलंदाजाकडून कधी ना कधी नो बॉल पडतोच. मात्र याला अपवाद असणारे असे काही गोलंदाज आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकीर्दीत कधीही नो बॉल टाकला नाही.

संपूर्ण कारकीर्दीत एकही नो बॉल न टाकणारे 5 गोलंदाज

मुंबई : क्रिकेटमध्ये नो बॉलचा तोटा काय असतो, हे क्रिकेटप्रेमींना वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रत्येक गोलंदाजाकडून कधी ना कधी नो बॉल पडतोच. मात्र याला अपवाद असणारे असे काही गोलंदाज आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकीर्दीत कधीही नो बॉल टाकला नाही.

कपिल देव – भारताने ज्याच्या नेतृत्त्वात पहिला विश्वचषक जिंकला त्या कपिलदेव यांच्या नावावर हा विक्रम आहे. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत कधीही नो बॉल टाकला नाही. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या कपिलदेव यांनी 131 कसोटी आणि 225 वन डे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. मात्र त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी कधीही नो बॉल टाकला नाही.

इयान बॉथम – इंग्लंडचे माजी क्रिकेटर बॉथम यांनी 102 कसोटी आणि 116 वन डे सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. मात्र कधीही नो बॉल टाकला नाही.

इम्रान खान – पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज इम्रान खान यांनी खेळलेल्या 88 कसोटी आणि 175 वन डे सामन्यांमध्ये कधीही नो बॉल टाकला नाही.

डेनीस लिली – ऑस्ट्रेलियाचे दिग्गज गोलंदाज डेनीस लिली यांनी 70 कसोटी सामन्यांमध्ये कधीही नो बॉल टाकला नाही.

लान्स गिब्ज – वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू लान्स गिब्ज यांनी 3 वन डे आणि 79 कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी केली. मात्र कधीही नो बॉल टाकला नाही.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: no ball नो बॉल
First Published:
LiveTV