आमीरची ऑफर कोहलीने नाकारली

अभिनेता आमीर खानने कॅप्टन कोहलीला एक ऑफर दिली, मात्र कोहलीने ती प्रांजळपणे नाकारली.

आमीरची ऑफर कोहलीने नाकारली

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली यांनी झी टीव्हीवरील एका चॅट शोमध्ये गप्पा मारल्या.

यावेळी दोघांनी आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक बाबींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. आमीरने अनुष्कापासून ते क्रिकेटमधील सर्वात आवडती खेळी अशा विविध मुद्द्यांवर विराटला बोलतं केलं.

तर विराटनेही आमीर खानबद्दल उत्सुकता वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं खुद्ध आमीरकडून काढून घेतली.

आमीरची विराटला ऑफर

दरम्यान, आमीर खानने विराट कोहलीला यावेळी एक ऑफरही दिली.

“विराट कोहलीच्या जाहिराती आपण पाहिल्या आहेत. त्यातील त्याची अॅक्टिंग  ही कसलेल्या अभिनेत्यासारखी आहे. त्यामुळे कोहलीने क्रिकेट खेळून झालं की आमच्या क्षेत्रात म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात यावं” अशी ऑफर आमीर खानने कोहलीला दिली.

आमीरची ऑफर कोहलीने नाकारली

दरम्यान, आमीरचही ही ऑफर विराट कोहलीने प्रांजळपणे नाकारली. कोहली म्हणाला, छोट्या छोट्या जाहिराती करणं हे छोटं काम आहे, ते मी झटपट आटोपण्याचा प्रयत्न करतो. जाहिरात करताना मला काही वेळासाठीच अभिनय करायचा आहे हे माहित असतं, त्यामुळे मी त्या आटोपून नेतो. पण मोठे सीन करणं अशक्य आहे, असं कोहली म्हणाला.

कोहलीला आवडलेला आमीरचा सिनेमा

यावेळी कोहलीने आमीर खानचा कोणता सिनेमा आपल्याला सर्वात जास्त आवडतो, याबद्दलही सांगितलं.

कोहली म्हणाला, आमीरचा ‘जो जिता वही सिकंदर’ हा सिनेमा मी कधीही विसरु शकणार नाही. शेवटच्या सायकल रेसमध्ये आमीर खानला दीपक तिजोरीचे साथीदार मारतात, मात्र आमीर पुन्हा त्यांना मागे टाकून पुढे येतो, हा सीन तर डोक्यात कायम आहे, असं कोहलीने सांगितलं.

संबंधित बातम्या

धोकादायक गोलंदाज कोण? आमीरच्या प्रश्नावर कोहलीचं उत्तर.. 

....तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV