15 चौकार, 7 षटकार, बांगलादेशविरोधात डिव्हिलयर्सची तुफानी खेळी

डिव्हिलियर्सने 104 चेंडूत 176 धावांची खेळी केली. यामध्ये 15 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे.

15 चौकार, 7 षटकार, बांगलादेशविरोधात डिव्हिलयर्सची तुफानी खेळी

पार्ल : कर्णधारपद सोडल्यानंतर पहिलाच सामना खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने बांगलादेशविरोधात दमदार शतक ठोकलं. डिव्हिलियर्सची धडाकेबाज फलंदाजी आणि अँडिल फेलुकवायोची सर्वोत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला 104 धावांनी पराभूत केलं आणि मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली.

डिव्हिलियर्सने आतापर्यंतच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट खेळी करत 176 धावा काढल्या. त्याचवेळी हाशिम अमलाने 85 धावा बनवल्या. दोघांच्या फलंदाजीमुळे 6 विकेट्सच्या बदल्यात 353 धावांचा डोंगर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरोधात उभा केला.

डिव्हिलियर्सने 104 चेंडूत 176 धावांची खेळी केली. यामध्ये 15 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे.

फेहलुकवायोने 40 धावा देत 4 विकेट्स काढल्या, तर इमरान ताहिरने 3, ड्वेन प्रिटोरियसने 2 विकेट्स काढल्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशचा संघ गारद झाला.

बांगलादेशकडून इमरुल कायेसने 68 धावांची खेळी, तर मुशफिकुर रहीमने 60 धावांची खेळी केली.

बांगलादेशकडून रुबेल हुसैनने सर्वात चांगली गोलंदाजी केली. त्याने 62 धावा देत 4 विकेट्स काढल्या. ऑलराऊंडर शाकिब अल हसनने 60 धावा देत 2 विकेट्स काढल्या.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV