गोरे लोकच हँडसम नसतात, वर्णद्वेषावरुन मुकुंदची पोस्ट

वर्णद्वेषाचा प्रकार अद्याप कायम असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. यावेळी दुसऱ्या-तिसऱ्या कोणाला नाही, तर भारताचा कसोटी संघातील सलामीवीर अभिनव मुकुंदला त्याचा अनुभव आला.

गोरे लोकच हँडसम नसतात, वर्णद्वेषावरुन मुकुंदची पोस्ट

मुंबई: वर्णद्वेषाचा प्रकार अद्याप कायम असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. यावेळी दुसऱ्या-तिसऱ्या कोणाला नाही, तर भारताचा कसोटी संघातील सलामीवीर अभिनव मुकुंदला त्याचा अनुभव आला.

वर्णद्वेषाला सामोरं जावं लागत असल्याचा स्वानुभव अभिनव मुकुंदला सोशल मीडियावर पोस्ट केला.

वयाच्या दहाव्या वर्षापासून देशात आणि देशाबाहेर क्रिकेट खेळलोय. त्यादरम्यान, रंगामुळे माझा अनेकदा अपमान झाला, पण मी त्याकडे लक्ष न देता जे लक्ष्य मला गाठायचे होते त्याकडेच लक्ष दिले आणि सकारात्मक विचार केला. त्यामुळे आपण आहात त्या रंगात आनंदी राहा, केवळ गोऱ्या रंगाचेच सुंदर दिसतात असं म्हणणं चुकीचं असल्याचं मुकुंदने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वर्णद्वेषी प्रवृत्तीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, अष्टपैलू रवीचंद्रन अश्विन, हार्दिक पंड्या याच्यासह अनेक खेळाडूही मुकुंदच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

अभिनव मुकुंदची फेसबुक पोस्ट

"मी वयाच्या दहाव्या वर्षांपासून क्रिकेट खेळत आलो आहे.  हळूहळू मी प्रगती करत इथवर पोहचलो आहे. देशाकडून खेळणं ही गर्वाची बाब आहे. मी कुणाची सहानुभूती मिळवण्यासाठी हे लिहित नाहीय, तर मी ज्याच्यावर सर्वाधिक विचार करतो, त्यावर लोकांनी विचार करावा, अशी माझी इच्छा आहे.

मी 15 वर्षापासून देश-विदेशात फिरलो आहे. माझ्या रंगावरुन अनेकवेळा मला ऐकून घ्यावा लागलं. माझी अनेकांनी थट्टा केली. मात्र ते आजपर्यंत मी गुपीत ठेवलं. जो कोणी क्रिकेट फॉलो करतो, तो याबाबत अधिक जाणू शकेल. मी खूप उन्हात क्रिकेट खेळलो आहे, त्यामुळे मी काळं पडत आहे, असा विचार कधीही माझ्या मनात आला नाही. क्रिकेट ही माझी आवड होती, तोच माझा आनंद होता. मी मूळचा चेन्नईचा आहे आणि मला वाटतं ते देशातील सर्वात उष्ण ठिकाण आहे.

माझ्या रंगावरुन मला अनेकांनी चिडवून शिव्या घातल्या, मात्र मी अशा लोकांकडे दुर्लक्ष करुन पुढे गेलो. मला माझं लक्ष्य गाठायचं होतं.

सोशल मीडियाच्या दुनियेत अनेक जण शिव्या घालताना दिसतात. त्यांच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. मित्रांनो गोरे लोकच हँडसम नसतात, तुम्ही प्रामाणिक राहा, ध्येयावर लक्ष ठेवा, तुमच्या रंगाची अजिबात काळजी करु नका".

https://twitter.com/mukundabhinav/status/895324499154841600

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV