नवा हॅण्डसम हंक, भारताच्या या युवा क्रिकेटपटूवर तरुणी फिदा!

कोहलीच्या तोडीचाच असलेल्या मयांक डगरने आपल्या हटके अंदाजाने सोशल साईट्सवर धुमाकूळ घातला आहे.

नवा हॅण्डसम हंक, भारताच्या या युवा क्रिकेटपटूवर तरुणी फिदा!

मुंबई: टीम इंडियाचा हॅण्डसम हंक म्हणून विराट कोहली परिचीत आहे. त्याच्या फिमेल फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच असते. मात्र आता कोहलीला टक्कर देणारा, क्रिकेट विश्वातील नवा हॅण्डसम चेहरा खूपच लाईक्स मिळवत आहे.

मयांक डगर असं या 20 वर्षीय क्रिकेटपटूचं नाव आहे. मयांक हा हिमाचल प्रदेशातील आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा जगभरातील स्टायलिश आणि फिट खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. शिवाय त्याच्या गुड लूक्समुळे जगभरातील तरुणी त्याच्यावर फिदा आहेत.

Mayank Dagar 4

मात्र कोहलीच्या तोडीचाच असलेल्या मयांक डगरने आपल्या हटके अंदाजाने सोशल साईट्सवर धुमाकूळ घातला आहे.

मयांकने अजून क्रिकेटच्या मैदानात आपला जलवा दाखवलेला नाही, पण तो त्याच्या गुड लूक्समुळे चर्चेत आला आहे.

PHOTO: मयांक डगरचे आणखी फोटो

मयांकने आतापर्यंत 8 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 30.57 च्या सरासरीने 28 विकेट घेतल्या आहेत. तर 126 धावा त्याने केल्या आहेत.

Mayank Dagar 16

विराट आणि मयांकमध्ये फरक म्हणजे कोहली फलंदाज आहे तर मयांक गोलंदाजी करतो. मयांक आपल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे.

Mayank Dagar 1

सोशल नेटवर्किंग साईट्स फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरर मयांक खूपच अक्टिव्ह असतो. त्याच्या इन्स्टाग्रामवरील फोटो त्याच्या अक्टिव्ह असण्याचा पुरावा देतात.

Mayank Dagar 12

महत्त्वाचं म्हणजे मयांक डगर हा भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागचा नातेवाईकही असल्याचं सांगण्यात येतं.

कोण आहे मयांक डगर?

  • मयांक डगर हिमाचल प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.

  • 11 नोव्हेंबर 1996 रोजी जन्मलेला मयांक 20 वर्षांचा आहे.

  • 2016 सालच्या भारताच्या अंडर 19 विश्वचषकाच्या संघात मयांक डगरचा समावेश होता.

  • मयांक उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करतो

  • वीरेंद्र सेहवागचा नातेवाईकही असल्याचं सांगण्यात येतं.


PHOTO: मयांक डगरचे आणखी फोटो

टीम इंडियाच्या नव्या हॅण्डसम हंकचा सोशल मीडियावर धुमाकूळ

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV