होम ग्राऊंडवर अजिंक्य रहाणेला बाहेर बसावं लागणार?

अजिंक्य रहाणे हा टीम इंडियाचा तिसरा सलामीवीर फलंदाज आहे, असं विराट कोहलीने स्पष्ट केलं आहे.

होम ग्राऊंडवर अजिंक्य रहाणेला बाहेर बसावं लागणार?

मुंबई : सलामीवीर शिखर धवनचं पुनरागमन झाल्यामुळे मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा ड्रेसिंग रुममध्ये बसण्याची वेळ येणार आहे. कारण अजिंक्य रहाणे हा आमचा तिसरा सलामीवर आहे, असं म्हणत कर्णधार विराट कोहलीने त्याला अंतिम अकरामध्ये जागा मिळणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

अजिंक्य रहाणे मधल्या फळीत खेळवायचं नाही, असंही विराट म्हणाला आहे. त्यामुळे सलामीला त्याला संधी मिळणार नसल्याने मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनही अंतिम अकरामध्ये घेतलं जाण्याची शक्यता नसल्याची माहिती आहे.

22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर पहिला सामना खेळवला जाणार आहे.

अजिंक्य रहाणेवर विराट काय म्हणाला?

रहाणेने तिसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज म्हणून मिळालेल्या सर्व संधींचा फायदा घेतला आहे. केएल राहुलही सलामीवीर फलंदाजांच्या स्पर्धेत आहे. मात्र अजिंक्य रहाणेने संधीचा फायदा घेत चांगली कामगिरी केली, असं विराटने सांगितलं.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डेच्या पूर्वसंध्येला बोलताना विराटने अनेक विषयांवरील प्रश्नांना उत्तरं दिली.

एकसारखे चार खेळाडू संघात असतात तेव्हा अशाच पद्धतीने संतुलन साधावं लागतं आणि एकाला अंतिम अकरामधून बाहेर रहावंच लागतं, असं विराटने स्पष्ट केलं. शिवाय रहाणे मधल्या फळीतील फलंदाज नसल्याचं सांगायलाही तो विसरला नाही.

संबंधित बातमी : रहाणे तिसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज : विराट कोहली

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV