पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राला अजिंक्य रहाणेचं उत्तर

नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या या शिलेदाराला आमंत्रण पत्र लिहिलं होतं. या पत्रात मोदींनी रहाणेला 'स्वच्छता ही सेवा' अभियानात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राला अजिंक्य रहाणेचं उत्तर

नवी दिल्ली : टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या या शिलेदाराला आमंत्रण पत्र लिहिलं होतं. या पत्रात मोदींनी रहाणेला 'स्वच्छता ही सेवा' अभियानात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं होतं.

अजिंक्य रहाणेने पंतप्रधान मोदींच्या पत्राचा फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. त्याचं उत्तर देताना रहाणेने लिहिलं आहे की, "आदरणीय नरेंद्र मोदी जी, तुमचं पत्र मिळाल्याने मी फारच आनंद आहे. 'स्वच्छता ही सेवा' अभियानात सहभागी होणं ही माझ्यासाठी सन्मानजनक बाब आहे."

https://twitter.com/ajinkyarahane88/status/911212302443130880

संपूर्ण देशात सफाई आणि स्वच्छता करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने हे अभियान सुरु केलं आहे. पंतप्रधानांनी रहाणेला 15 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणाऱ्या या स्वच्छता अभियानात सामील होण्याचं आवाहन केलं आहे. या अभियानात देशातील नागरिकांनी सहभागी व्हायला हवं, असंही म्हटलं आहे.

दरम्यान, यापूर्वी 2 ऑक्टोबर 2016 रोजी गांधी जयंतीला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने 'स्वच्छ भारत' अभियानात भाग घेतला होता. कोहली आणि टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनी कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमची स्वच्छता केली होती.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV