नववीत शिकणाऱ्या पठ्ठ्याला राष्ट्रकुलमध्ये गोल्ड मेडल!

भारताच्या अवघ्या 15 वर्षाच्या म्हणजेच नववी/दहावीत शिकणाऱ्या पोराने नेमबाजीत राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं.

नववीत शिकणाऱ्या पठ्ठ्याला राष्ट्रकुलमध्ये गोल्ड मेडल!

सिडनी: ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये भारताची पदकांची लयलूट सुरुच आहे.

भारताच्या अवघ्या 15 वर्षाच्या म्हणजेच नववी/दहावीत शिकणाऱ्या पोराने नेमबाजीत राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं.

अनिश भानवालाने 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात विक्रमी कामगिरी करत सुवर्णभेद केला. अनिशने तब्बल 30 गुण मिळवत विक्रम रचला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणारा अनिश हा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.

अनिशच्या या कामगिरीने भारताच्या खात्यात 16 सुवर्णपदकं जमा झाली आहेत.

फायनलमद्ये अनिशसमोर ऑस्ट्रेलियाचा 20 वर्षीय नेमबाज सर्जी वेग्लेव्स्की आणि इंग्लंडचा 28 वर्षीय सॅम गोविन यांचं आव्हान होतं. हे आव्हान मोडित काढत, 15 वर्षीय अनिशने जबरदस्त कामगिरी केली.

अनिशला 30 तर, रौप्यपदक पटकावणाऱ्या सर्जी वेग्लेव्स्कीला 28 तर कांस्यपदक मिळवणाऱ्या सॅम गोविनला 17 गुण मिळाले.

कोण आहे अनिश भानवाला?

  • अनिश भानवाला हा भारतीय नेमबाज आहे.

  • त्याचा जन्म 26 सप्टेंबर 2002 मध्ये हरियाणातील सोनिपत इथे झाला.

  • हरियाणातील कर्नाल इथला रहिवासी आहे.

  • 2017 पासून तो भारताच्या नेमबाजी संघाचा सदस्य आहे.

  • अनिशने ISSF ज्यु. वर्ल्ड चॅम्पियन्स 2017 मध्ये त्याने 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं होतं

  • 2017 मध्ये राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत 25 मी. रॅपिड फायरमध्ये रौप्यपदक पटकावलं.

  • ISSF ज्यु. वर्ल्ड चॅम्पियन्स 2018 मध्ये वैयक्तिक सुवर्ण आणि सांघित रौप्य पदकाची कमाई


सेहवागकडून कौतुक

दरम्यान, अनिश भानवालाच्या या कामगिरीने त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती कार्यालयापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वजण त्याचं अभिनंदन करत आहेत. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही अनिश भानवालाचं त्याच्या स्टाईलमध्ये कौतुक केलं.

"अविश्वसनीय अनिश भानवाला...अवघ्या 15 व्या वर्षी 25 मी. रॅपीड फायर पिस्टलमध्ये गोल्ड मेडल जिंकलसं. अभिनंदन अनिश.. याशिवाय तेजस्विनी सावंतचं सुवर्ण कामगिरीबद्दल आणि अंजुम मुदगिलचं रौप्य पदक पटकावल्याबद्दल अभिनंदन..." असं ट्विट सेहवागने केलं.संबंधित बातम्या

कोण म्हणतंय करिअर संपलं, तेजस्विनीने पुन्हा सोनं जिंकलं!

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Anish Bhanwala at just 15 years of age wins a Gold in 25 m rapid pistol
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV