विराट-अनुष्काचा पारंपरिक लूक, फोटो व्हायरल

या फोटोत विराट काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे, तर अनुष्का गुलाबी रंगाच्या लहंग्यात सजलेली दिसत आहे.

विराट-अनुष्काचा पारंपरिक लूक, फोटो व्हायरल

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोत दोघेही पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत. हा फोटो एका अॅड शूटचा असल्याचं म्हटलं जात आहे.

या फोटोत विराट काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे, तर अनुष्का गुलाबी रंगाच्या लहंग्यात सजलेली दिसत आहे. विराट अनुष्काकडे एकटक पाहत असून अनुष्काच्या चेहऱ्यावर हास्य आहे. हा फोटो अनुष्का-विराटच्या #virushka नावाच्या फॅनक्लबच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.#VirUshka ❤???? #adshoot


A post shared by VirUshka ???? (@_virushkaa_) on

मुंबईत मंगळवारी या जाहिरातीचं चित्रीकरण झालं. परंतु दोघांनी कोणत्या जाहिरातीसाठी एकत्र काम केलं, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

Virat_Anushka_2
दरम्यान, अनुष्का आणि विराट जाहिरातीत एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ते हेड अँड शोल्डर्स या शॅम्पूच्या जाहिरातीत झळकले होते. तेव्हापासूनच दोघांमध्ये प्रेम फुलल्याचं सांगितलं जातं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV