विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो

पारंपारिक पोशाखातील विराट-अनुष्काची जोडी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो

मुंबई: टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे दिवाळी विशेष फोटो सोशल मीडियावर लाईक्स मिळवत आहेत.

पारंपारिक पोशाखातील विराट-अनुष्काची जोडी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

खरंतर हे फोटो गेल्या महिन्यातील आहेत. कपड्यांच्या जाहिरातीनिमित्त हे फोटोशूट करण्यात आलं होतं. मात्र विराट-अनुष्काच्या चाहत्यांनी हे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

Virat Kohli 1

विराट-अनुष्काची ही जाहिरात ‘मान्यवर’च्या कपड्यांची आहे. त्यांचे हे फोटो सध्या चाहत्यांना ‘थस्म अप’ करण्यास भाग पाडत आहेत.

अनुष्का सुपर हॉनेस्ट

दरम्यान, विराट कोहलीने  नुकतंच झी टीव्हीवरील एका कार्यक्रमात अभिनेता आमीर खानसोबत गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी आमीरने विराटला अनुष्काबद्दलही प्रश्न विचारला होता.  अनुष्काची सर्वाधिक आवडणारी गोष्ट कोणती असं कोहलीला विचारण्यात आलं. त्यावर विराट म्हणाला, अनुष्काचा ही ‘सुपर हॉनेस्ट’ अर्थात अतिशय प्रामाणिक आहे. तिच्या ओटात एक आणि पोटात एक असं कधीच नसतं. तिला जे वाटतं ते बोलून टाकते. कदाचित त्यामुळेच आमची जोडी जमली असावी”

संबंधित बातमी

धोकादायक गोलंदाज कोण? आमीरच्या प्रश्नावर कोहलीचं उत्तर..

….तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली

आमीरची ऑफर कोहलीने नाकारली

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV