VIDEO: तोंडात नोट पकडून अनुष्काचा डान्स

विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी काल दिल्लीत पार पडली.

By: | Last Updated: 22 Dec 2017 11:05 AM
VIDEO: तोंडात नोट पकडून अनुष्काचा डान्स

नवी दिल्ली: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी काल दिल्लीत पार पडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली.

या पार्टीत अनुष्का शर्माची साडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. अनुष्काची ही साडी वाराणसीच्या पीलीकोठीच्या कारागीरांनी बनवली.

अनुष्काची साडी आणि ज्वेलरीचं डिझाईन सब्यासाची केलं असून, त्यांनी त्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

तोंडात नोट घेऊन अनुष्काचा डान्स

दरम्यान, या पार्टीत अनुष्काने केलेला डान्सही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अनुष्काने तोंडात नोट घेऊन डान्स केला. रिसेप्शननंतर विराट आणि अनुष्का डान्स फ्लोअरवर आले. गाण्याच्या तालावर दोघांनी चांगलाच ठेका धरला. अनुष्काने तर तोंडात नोट पकडून डान्स केला.

शिखर धवनचाही ठेका

या पार्टीत बहुतेकांनी डान्स केला. टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शिखर धवननेही मौजा ही मौजा गाण्यावर डान्स केला.

दरम्यान, अनुष्का-विराटची आणखी एक रिसेप्शन पार्टी मुंबईत होणार आहे. 26 डिसेंबरला ही पार्टी असून, बॉलिवूड स्टार्स आणि टीम इंडियाचे सदस्य या पार्टीला उपस्थित असतील.Haydee Dansa???????????? #anushkasharma


A post shared by Anushka Sharma Azerbaijan???? (@anushkarsharma) on

Narendra Modi???? #anushkasharma


A post shared by Anushka Sharma Azerbaijan???? (@anushkarsharma) on
सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Anushka Sharma Virat Kohli Delhi Reception: Anushka Sharma & Virat Kohli dance
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV