आर्चरी स्पर्धेदरम्यान बाण थेट मैदानाबाहेर, खेळाडूच्या हातात घुसला!

बाण हातात घुसल्याने जखमी झालेल्या जुई ढगे हिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिच्यावर सध्या वालावलकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

आर्चरी स्पर्धेदरम्यान बाण थेट मैदानाबाहेर, खेळाडूच्या हातात घुसला!

रत्नागिरी : आर्चरी स्पर्धेदरम्यान एका स्पर्धकाच्या धनुष्यातून सुटलेला बाण राष्ट्रीय खेळाडू जुई ढगे हिच्या हातात घुसला. बाण हातात आरपार घुसल्याने जुई जखमी झाली.

महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोसिएशन यांच्या विद्यामाने आयोजित सब-जुनियर गटाच्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेला आज चिपळूण जवळील डेरवण येथे सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्पर्धा सुरु झाल्यानंतर दुर्घटना घडली.

नेमकं काय झालं?

डेरवणमध्ये आर्चरी स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर, एका स्पर्धकाच्या धनुष्यातून सुटलेला बाण थेट मैदानाच्या बाहेर गेला. मैदानाबाहेरुन जाणाऱ्या जुई ढगे हिच्या हातात बाण आरपार घुसला. जुई ढगे ही राष्ट्रीय खेळाडू आहे.

बाण हातात घुसल्याने जखमी झालेल्या जुई ढगे हिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिच्यावर सध्या वालावलकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशनने हा अपघात घडल्यानंतर असोसिएशन सर्व उपाययोजना तात्काळ केल्या असून, जुई ढगे सुखरुप असल्याचे सांगितले.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Arrow pierces to national Player Jui Dhaage latest udpates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Arrow Jui Dhage जुई ढगे बाण
First Published:
LiveTV