आयपीएल लिलाव : 800 अब्जांच्या मालकाच्या मुलावर 30 लाखांची बोली

अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावण्यात आली. तर काही खेळाडूंना बेस प्राईसवरच खरेदी करण्यात आलं.

आयपीएल लिलाव : 800 अब्जांच्या मालकाच्या मुलावर 30 लाखांची बोली

बंगळुरु : आयपीएल लिलावात संघांच्या मालकांनी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावण्यात आली. तर काही खेळाडूंना बेस प्राईसवरच खरेदी करण्यात आलं.

आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी एक असा खेळाडू होता, ज्याला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आलं. मात्र त्याच्या संपत्ती किती हे तुम्ही ऐकलं तर आश्चर्याचा धक्का बसेल. तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक कुमार मंगलम बिर्लांचा मुलगा आर्यमान विक्रम बिर्ला आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची सध्याची संपत्ती 800 अब्ज रुपये आहे.

आयपीएल लिलावात आर्यमानसाठी राजस्थान रॉयल्सने बोली लावत त्याला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं. त्याची बेस प्राईस 20 लाख रुपये होती.

20 वर्षी आर्यमान फलंदाज असून त्याने आतापर्यंत केवळ एक प्रथम श्रेणी सामना खेळलेला आहे.

संबंधित बातम्या :

आयपीएल 2018 : आठ संघ, 169 खेळाडू, संपूर्ण यादी


... म्हणून कोलकात्याने गौतम गंभीरला संघात घेतलं नाही


आयपीएलमध्ये गंभीरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा


जयदेव सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू, तब्बल 11.50 कोटींची बोली

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: aryaman birla brought in 30 lakhs by rajasthan royals
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV