मेरी कोमचा 'गोल्डन' पंच, पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन

मेरी कोमने 2014 सालच्या एशियाडनंतर मिळवलेलं हे पहिलंच आंतरराष्ट्रीय पदक ठरलं.

मेरी कोमचा 'गोल्डन' पंच, पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन

हो चि मिन्ह (व्हिएतनाम) : भारताच्या एम सी मेरी कोमने आशियाई महिला बॉक्सिंगच्या इतिहासात पाचव्यांदा सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. मेरी कोमने 48 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत उत्तर कोरियाच्या किम ह्यान्ग मीचा 5-0 असा धुव्वा उडवला.

व्हिएतनाममधल्या हो चि मिन्ह शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मेरी कोमने 2014 सालच्या एशियाडनंतर मिळवलेलं हे पहिलंच आंतरराष्ट्रीय पदक ठरलं.

या कामगिरीने तिच्या आशियाई महिला बॉक्सिंगमधल्या पदकांची संख्या सहावर गेली आहे. या स्पर्धेत 35 वर्षीय मेरी कोमने आजवर 2003, 2005, 2010 आणि 2012 मध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं, तर 2008 मध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. आता 2017 मध्ये पुन्हा तिने सुवर्ण पदकाची कमाई केली.

एक वर्षानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये परतलेल्या मेरी कोमने सुवर्ण पदक जिंकत दमदार कमबॅक केलं. राज्यसभा खासदार असलेली मेरी कोम पाच वर्षांपर्यंत 51 किलो वजनी गटात भाग घेत होती. मात्र यावेळी तिने 48 किलो गटात कमबॅक केलं आहे.

अनुभवाच्या जोरावर तिने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या फायनलमध्ये उत्तर कोरियाच्या बॉक्सरचं आव्हान मोडित काढलं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Asian Boxing Championship : Mary Kom wins gold by defeating North Korea’s Kim Hyang-Mi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV