ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात अँड्र्यू टायचा समावेश

ऑस्ट्रेलिया संघ पाच वन डे सामन्यांच्या मालिकेनंतर भारत दौऱ्यात तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात अँड्र्यू टायचा समावेश

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या संघात दुखापतग्रस्त पॅट कमिन्सऐवजी अँड्र्यू टायचा समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया संघ पाच वन डे सामन्यांच्या मालिकेनंतर भारत दौऱ्यात तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन करणारा अँड्र्यू टाय नुकताच दुखापतीतून सावरला आहे.

यंदाच्या आयपीएलदरम्यान त्याचा खांदा निखळला होता. त्या दुखापतीतून सावरल्यानंतर टाय पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV