मायदेशी जाण्यापूर्वी रॉस टेलरने हिंदी मेसेजचं रहस्य उलगडलं

मैदानावरील सामन्यांसोबतच वीरेंद्र सेहवाग आणि रॉस टेलर यांच्यातील ट्विटरवरील सामनाही फार रंजक आणि मजेशीर होता. वन डे आणि ट्वेण्टी 20 मालिका संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ बुधवारी मायदेशी रवाना झाला.

By: | Last Updated: > Friday, 10 November 2017 11:39 AM
Before leaving India Ross Taylor revealed his hindi banter with Virender Sehwag

मुंबई : तिरुवनंतपुरममधील सामना जिंकून भारताने न्यूझीलंडविरुद्धची ट्वेण्टी 20 मालिका खिशात घातली. पण मैदानावरील सामन्यांसोबतच वीरेंद्र सेहवाग आणि रॉस टेलर यांच्यातील ट्विटरवरील सामनाही फार रंजक आणि मजेशीर होता.

वन डे आणि ट्वेण्टी 20 मालिका संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ बुधवारी मायदेशी रवाना झाला. पण जाण्याआधी किवी फलंदाज रॉस टेलरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सहकारी इश सोढी आणि स्टाफ सदस्य देव यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला.

‘धुलाई के बाद सिलाई’, सेहवागचं रॉस टेलरला उत्तर

इमोशनल मेसेजबरोबरच त्याने सेहवागला आणखी एक आव्हान देत त्याच्या हिंदी मेसेजमागचं रहस्यही उलगडलं.

 

रॉस टेलर म्हणतो, “भारतात येऊन नेहमीप्रमाणे आनंद मिळाला. वीरेंद्र सेहवागला हिंदीतू उत्तर शकलो, त्यामागे हे दोघे आहेत. देव आणि सोढी धन्यवाद. जाण्याआधी अखेरचा मेसेज, धुलाई और सिलाई आने वाले समय में जारी रहेगी!”

…अगली सिलाई त्रिवेंद्रम में, टेलरकडून सेहवागची फिरकी

खरंतर वीरेंद्र सेहवाग ट्विटरवरुन अनेकांची फिरकी घेत असतो. मात्र न्यूझीलंडच्या रॉस टेलरने त्याच्याच भाषेत सेहवागला उत्तर दिलं होतं. सुरुवातीला सेहवागने टेलरचा उल्लेख ‘दर्जी’ केल्यानतंर, त्याने हिंदीत उत्तर दिल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर ट्वेण्टी 20 मालिकेदरम्यान दोघांच्या मजेशीर ट्वीटचा सिलसिला सुरु होता. त्यांचे चाहतेही दोघांच्या रंजक संभाषणाचा आनंद लुटत होते.

सेहवागकडून टेलरचा ‘दर्जी’ उल्लेख, टेलरचंही हिंदीतून उत्तर

मात्र आता मायदेशी रवाना होण्यापूर्वी, सेहवागला हिंदीत उत्तर देण्यासाठी हे दोघे आपली मदत करत असल्याचं रॉस टेलरने सांगितलं आणि त्याच्या हिंदी मेसेजच्या रहस्याचा उलगडला केला.

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Before leaving India Ross Taylor revealed his hindi banter with Virender Sehwag
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

बलात्कारप्रकरणी ब्राझीलच्या फुटबॉलपटूला 9 वर्षांची शिक्षा
बलात्कारप्रकरणी ब्राझीलच्या फुटबॉलपटूला 9 वर्षांची शिक्षा

मिलान (इटली) : ब्राझीलचा फुटबॉलपटू रोबिंहोला बलात्कारप्रकरणी तब्बल

केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा
केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा

बीसीसीआयच्या एकोणीस वर्षांखालील मुलींच्या वन डे सुपर लीग सामन्यात

'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ!
'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ!

केप टाऊन : ‘ब्लेड रनर’ ऑस्कर पिस्टोरियसला गर्लफ्रेण्ड रिव्हा

VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!
VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा

'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!
'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड जेवढा शांत आणि

IndvsSL : इशांत, अश्विन आणि जाडेजाने पहिला दिवस गाजवला
IndvsSL : इशांत, अश्विन आणि जाडेजाने पहिला दिवस गाजवला

नागपूर:  भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 205 धावांत

टीम इंडियाला पंड्याचा पर्याय मिळाला, विराटचीही पसंती
टीम इंडियाला पंड्याचा पर्याय मिळाला, विराटचीही पसंती

नागपूर : जलद गोलंदाज असलेल्या अष्टपैलू खेळाडूचा टीम इंडियाला

स्पेशल रिपोर्ट : धर्माची बंधनं झुगारून ते एक झाले
स्पेशल रिपोर्ट : धर्माची बंधनं झुगारून ते एक झाले

कोल्हापूर/मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री

झहीर आणि सागरिका अखेर विवाहबंधनात!
झहीर आणि सागरिका अखेर विवाहबंधनात!

मुंबई : टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान अखेर बोहल्यावर चढला आहे.

कोल्हापूरची अनुजा पाटील टीम इंडियाची कर्णधार
कोल्हापूरची अनुजा पाटील टीम इंडियाची कर्णधार

मुंबई : बांगलादेश ‘अ’ संघाबरोबर भारतात होणाऱ्या वनडे आणि टी 20