Australian Open : व्हीनस विल्यम्स पहिल्याच फेरीत बाहेर

स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकनं गतवेळच्या उपविजेत्या व्हीनस विल्यम्सचा कडवा संघर्ष एक तास ५३ मिनिटांत मोडून काढला.

Australian Open : व्हीनस विल्यम्स पहिल्याच फेरीत बाहेर

अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सचं ऑस्ट्रेलियन ओपनमधलं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं आहे. स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकनं गतवेळच्या उपविजेत्या व्हीनस विल्यम्सचा कडवा संघर्ष एक तास ५३ मिनिटांत मोडून काढला.

बेलिंडानं हा सामना ६-३, ७-५ असा सरळ दोन सेट्समध्ये जिंकला. गतवर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीची फायनल सेरेना आणि व्हीनस विल्यम्स या भगिनींमध्ये झाली होती. त्यात व्हीनसला हार स्वीकारावी लागली होती.

यंदा सेरेना विल्यम्सच्या अनुपस्थितीत व्हीनसला विजेतेपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात येत होती. पण अवघ्या वीस वर्षांच्या बेलिंडा बेन्सिकनं व्हीनसला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Belinda Bencic shocks Venus Williams at Australian Open
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV