अफगाणिस्तानचं बंगळुरुत भारताविरुद्ध कसोटी पदार्पण होणार

उभय संघांमध्ये हा सामना बंगळुरुत 14 ते 18 जून या काळात खेळवला जाईल.

अफगाणिस्तानचं बंगळुरुत भारताविरुद्ध कसोटी पदार्पण होणार

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध होणार आहे. उभय संघांमध्ये हा सामना बंगळुरुत 14 ते 18 जून या काळात खेळवला जाईल.

बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका संयुक्त पत्रकात याची माहिती दिली आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातले राजकीय आणि खेळातील संबंध अत्यंत चांगले आणि जुने आहेत. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध होईल, अशी घोषणा स्वतः बीसीसीआयने पुढाकार घेत गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2017 मध्ये केली होती.

आयर्लंडसोबत अफगाणिस्तानने गेल्या वर्षी जूनमध्ये कसोटी खेळण्यासाठी मान्यता मिळवली आहे. उभय देशांचे क्रिकेट बोर्ड आयसीसीचे पूर्णवेळ सदस्यही बनले आहेत. अफगाणिस्तानने गेल्या काही दिवसांपासून टी-20 आणि वन डेत शानदार प्रदर्शन केलं आहे.

आयसीसी रँकिंगमध्येही अफगाणिस्तान संघ टॉप 10 मध्ये आहे. टी-20 मध्ये अफगाणिस्तान 9 व्या, तर वन डे मध्ये अकराव्या स्थानावर आहे.

आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच सामना असेल, ज्यानंतर भारत दोन टी-20 सामन्यांसाठी आयर्लंड आणि त्यानंतर इंग्लंडचा दौरा करणार आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bengaluru to host afghanistans maiden test match against India
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV