झहीरऐवजी भरत अरुण टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक होणार?

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची नियुक्ती झाल्यानंतर आता गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुणची नियुक्ती होऊ शकते. आपल्याला हव्या असलेल्या स्टाफसाठी शास्त्रींनी थेट बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडं गाऱ्हाण मांडलं आहे. त्यामुळे आता गोलंदाजी कोच म्हणून भरत अरुण यांची वर्णी लागू शकते.

bharat arun appointed as bowling coach of indian team reports latest update

मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची नियुक्ती झाल्यानंतर आता गोलंदाजी प्रशिक्षक  म्हणून भरत अरुणची नियुक्ती होऊ शकते. आपल्याला हव्या असलेल्या स्टाफसाठी शास्त्रींनी थेट बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडं गाऱ्हाण मांडलं आहे. त्यामुळे आता गोलंदाजी कोच म्हणून भरत अरुण यांची वर्णी लागू शकते. असे संकेत सध्या मिळत आहे.

शास्त्रींनी यासाठी थेट बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे दार ठोठावत क्रिकेट सल्लागार समितीकडे (सीएसी) पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. सीएसीमध्ये गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. याच समितीनं राहुल द्रविडला परदेश दौऱ्यावर फलंदाजी सल्लागार आणि झहीरला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं.

बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं क्रिकेटनेक्स्ट या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की, ‘शास्त्रींना हवा असणारा स्टाफ देण्याचं सीओएनं मान्य केलं आहे. सीओएच्या मते, मुख्य प्रशिक्षकाला कायमच गोलंदाजी कोचसोबत काम करायचं असतं. त्यामुळे दोघांमध्ये ताळमेळ असणं फारच आवश्यक आहे.’

गांगुलीच्या पसंतीनुसार झहीरची गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण गांगुली आणि शास्त्री यांच्यात फार काही चांगले संबंध नाही. त्यामुळेच शास्त्रींना हवा असणारा स्टाफ गांगुलीनं दिला नसल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, सीओएनं शनिवारी स्पष्ट केलं की, द्रविड आणि झहीर यांच्या नावाची फक्त शिफारस करण्यात आली होती. याबाबतचा निर्णय हा मुख्य प्रशिक्षकांशी चर्चा करुनच घेतला जाईल. यासाठी बीसीसीआयनं एका नवी चार सदस्यीय समिती तयार केली असून ते द्रविड आणि झहीर यांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेतील.

दरम्यान, शास्त्रींना आपल्या आवडीचा स्टाफ हवा आहे. झहीरऐवजी त्यांनी आपल्या जवळचा मित्र भरत अरुणच्या नावाची गोलंदाजी कोच म्हणून शिफारस केली होती. शास्त्रींच्या मते, झहीर ही एक चांगली निवड आहे. पण भारतीय संघाला पूर्णवेळ गोलंदाजी कोच हवा आहे.

 

संबंधित बातम्या:

 

द्रविड आणि झहीर यांचा अपमान सुरु आहे: रामचंद्र गुहा

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:bharat arun appointed as bowling coach of indian team reports latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

IndvsSL : श्रीलंका फॉलोऑनच्या छायेत
IndvsSL : श्रीलंका फॉलोऑनच्या छायेत

गॉल:  विराट कोहलीच्या टीम इंडियानं श्रीलंकेची पाच बाद 154 अशी दाणादाण

INDvsSL: श्रीलंकेविरुद्ध 600 धावा, भारताची सामन्यावर मजबूत पकड
INDvsSL: श्रीलंकेविरुद्ध 600 धावा, भारताची सामन्यावर मजबूत पकड

गॉल : गॉल कसोटीत शिखर धवन आणि पुजाराच्या दीड शतकी खेळीच्या जोरावर

अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना पाहायचं आहे : मॅग्रा
अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना पाहायचं आहे : मॅग्रा

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान

गॉल कसोटीत पहिला दिवस भारताचा, धवननंतर पुजाराचीही शतकी खेळी
गॉल कसोटीत पहिला दिवस भारताचा, धवननंतर पुजाराचीही शतकी खेळी

गॉल : भारतीय फलंदाजांनी गॉल कसोटीचा पहिला दिवस गाजवला. सलामीवीर

INDvsSL: धवनची धडाकेबाज खेळी, द्विशतक अवघ्या 10 धावांनी हुकलं
INDvsSL: धवनची धडाकेबाज खेळी, द्विशतक अवघ्या 10 धावांनी हुकलं

गॉल (श्रीलंका): श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत भारताचा सलामीवीर

शानदार कामगिरी करणाऱ्या महिला संघाचं मायदेशात जल्लोषात स्वागत
शानदार कामगिरी करणाऱ्या महिला संघाचं मायदेशात जल्लोषात स्वागत

मुंबई : महिला क्रिकेट विश्वचषकात उपविजेतेपद पटकावणारा भारतीय संघ

कर्णधार मिताली राजला BMW कार गिफ्ट!
कर्णधार मिताली राजला BMW कार गिफ्ट!

मुंबई: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा

प्रशिक्षक नियुक्ती वादावर कर्णधार कोहलीची प्रतिक्रिया
प्रशिक्षक नियुक्ती वादावर कर्णधार कोहलीची प्रतिक्रिया

गॉल (श्रीलंका) : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक

स्पेशल रिपोर्ट : श्रीलंकेचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज
स्पेशल रिपोर्ट : श्रीलंकेचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज

मुंबई : विराट कोहलीची टीम इंडिया आणि रंगाना हेराथचा श्रीलंका संघ

6 चेंडूत 6 षटकार, फलंदाज रॉसची तुफानी फटकेबाजी
6 चेंडूत 6 षटकार, फलंदाज रॉसची तुफानी फटकेबाजी

हेडिंग्ले (इंग्लंड) : क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार असं म्हटलं तर