कोलकात्याची शेरवानी, जयपूरची मोजडी, भुवीच्या लग्नाची तयारी

भुवनेश्वरच्या मेरठमधील घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. मेरठमधील एका हॉटेलवर मेहंदी समारंभ पार पडला.

कोलकात्याची शेरवानी, जयपूरची मोजडी, भुवीच्या लग्नाची तयारी

नवी दिल्ली: टीम इंडियाचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारची ‘लग्नघटिका’ समीप आली आहे. उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला भुवी त्याची बालमैत्रीण नुपूर नागरशी लग्नबंधनात अडकणार आहे.

भुवनेश्वरच्या मेरठमधील घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. मेरठमधील एका हॉटेलवर मेहंदी समारंभ पार पडला. 5 फेब्रुवारी 1990 रोजी जन्मलेला भुवनेश्वर 27 वर्षांचा आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 8 विकेट्स घेणारा भुवनेश्वर मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. मात्र आता उर्वरित दोन कसोटीत तो खेळू शकणार नाही.

एकीकडे लगीनघाई सुरु असूनही, भुवनेश्वर पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरलाच, शिवाय त्याने सर्वोच्च परफॉर्मन्स देत, टीम इंडियाला या कसोटीवर वर्चस्व गाजवण्याची संधी दिली.

भुवनेश्वर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त होता, तर दुसरीकडे त्याच्या लग्नपत्रिका वाटण्याचं काम सुरु होतं. भुवनेश्वरची आई इंद्रेश देवी लेकाच्या लग्नाच्या आनंदात न्हाऊन गेल्या आहेत. संगीत सोहळ्यात त्यांनीही ठेका धरुन आपला आनंद साजरा केला.

https://twitter.com/BhuviOfficial/status/915995449533767680

तर पोराच्या लग्नाच्या तयारीत वडील किरणपाल सिंह हे न थकता पाहुणे-रावळ्यांची यादी बनवण्यात व्यस्त आहेतच, शिवाय मुलाच्या तयारीतही ते हिरीरीने सहभागी होत आहेत.

कोलकात्याची शेरवानी, जयपूरची मोजडी

भुवनेश्वरसाठी कोलकात्यावरुन शेरवानी, तर जयपूरवरुन मोजडी मागवण्यात आल्याचं, किरणपाल सिंह यांनी सांगितलं. तर भावाच्या लग्नासाठी भुवीची बहीणही खूपच तयारीत आहे, त्यासाठी तीने भुवनेश्वरसाठी दिल्लीवरुन फेटा आणला आहे.

लग्नसोहळा

भुवनेश्वरच्या लग्नसोहळा आजपासूनच सुरु झाला आहे. आज गीत-संगीत आणि मेहंदी समारंभ झाला. तर उद्या म्हणजे 23 नोव्हेंबरला 10 वाजता भुवनेश्वरची घोड्यावरुन वरात निघेल, ती लग्नमंडपापर्यंत जाईल.

लग्नमंडपात लग्नाचे विधी पार पडतील. त्यानंतर संध्याकाळी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.

कोण आहे नुपूर :

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारची होणारी पत्नी नुपूर नोएडामधून बीटेक झाली आहे. नोएडामध्येच ती एका खासगी कंपनीत काम करते. नुपूर आणि भुवनेश्वरचा साखरपुडा 4 ऑक्टोबरला झाला होता.

श्रीलंकेविरोधातील उर्वरित 2 सामन्यांना भुवी मुकणार

भुवनेश्वरला श्रीलंकेविरोधातील उर्वरित दोन कसोटी सामन्यांना मुकावं लागणार आहे. तामिळनाडूचा ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकरला भुवनेश्वर कुमारच्या जागी संधी देण्यात आली. भारतीय अ संघ आणि तामिळनाडूकडून खेळताना विजय शंकरने दमदार प्रदर्शन केलं आहे.

पहिल्या कसोटीत सामनावीर

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वरने महत्त्त्वाची भूमिका निभावली. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दोन्ही डावात मिळून त्याने आठ विकेट घेतल्या.

संबंधित बातम्या

तुझं लग्न आहे, कसं वाटतंय?, धवनच्या प्रश्नाला भुवीचं हटके उत्तर

भुवनेश्वर आणि धवनची दुसऱ्या कसोटीतून माघार

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला! 

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bhuvneshwar Kumar to marry Nupur Nagar on November 23|
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV