फलंदाजाचं त्रिशतक, एक डाव आणि 870 धावांनी मात

बिहारमधील राजवंशनगरच्या एनर्जी क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात आला.

फलंदाजाचं त्रिशतक, एक डाव आणि 870 धावांनी मात

पाटणा : बिहारने विजय मर्चंट ट्रॉफीच्या अंडर-16 सामन्यात अरुणाचल प्रदेशला एक डाव आणि 870 धावांनी मात दिली. बिहारमधील राजवंशनगरच्या एनर्जी क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात आला.

बिहारने 7 बाद 1003 धावांवर डाव घोषित केल्यानंतर अरुणाचल प्रदेशचा दुसरा डाव केवळ 54 धावांवर गुंडाळला. अरुणाचल प्रदेशचा पहिला डाव 83 धावांवर आटोपला होता.

पहिल्या डावात 914 धावांची आघाडी घेतल्यानंतर बिहारने अरुणाचलचा डाव 54 धावांवर गुंडाळला. पहिल्या डावात 7 विकेट घेणाऱ्या रेशू राय या गोलंदाजाने दुसऱ्या डावात 23 धावा देत 6 विकेट घेतल्या.

त्रिशतक ठोकणाऱ्या बलजित सिंह बिहारीने 380 चेंडूत नाबाद 358 धावा केल्या. यामध्ये 36 चौकारांचा समावेश होता. याशिवाय प्रकाश बाबू या फलंदाजाने 220 आणि अर्णव किशोरने 169 धावांची खेळी केली.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bihar under
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV