आर माधवनच्या ताफ्यात जबरदस्त क्रुझर बाईक, किंमत तब्बल....

आर माधवनने इन्स्टाग्रामवर या बाईकचा फोटो शेअर केला असून चाहत्यांनीही ती प्रचंड आवडत आहे. माधवनने या बाईकच्या डिलिव्हरीचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आर माधवनच्या ताफ्यात जबरदस्त क्रुझर बाईक, किंमत तब्बल....

मुंबई : बॉलिवूड स्टार आर माधवनला अभिनयाशिवाय बाईकचाही शौक आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्याने आपल्या ताफ्यात क्रुझर मोटरसायकलचा समावेश केला आहे. आर माधवनच्या या बाईकची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या बाईकचं नाव आहे इंडियन रोडमास्टर आणि त्याची किंमत आहे तब्बल 40 लाख रुपये.

आर माधवनने इन्स्टाग्रामवर या बाईकचा फोटो शेअर केला असून चाहत्यांनीही ती प्रचंड आवडत आहे. माधवनने या बाईकच्या डिलिव्हरीचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे.
The Arrival .. Indian Roadmaster .. the beast .. Proudly Indian .. @indianmotorcyclesindia pankajdubey1967.

A post shared by R. Madhavan (@actormaddy) on
माधवनच्या बाईकचा ताफा
हिंदी आणि तामीळ चित्रपटांमध्ये छाप उमटवणाऱ्या आर माधवनच्या ताफ्यात बीएमडब्ल्यू के1600 जीटीएल, डुकाटी डायवेल आणि ‘यामाहा व्ही- मॅक्स’ या एकाहून एक जबरदस्त बाईक आहेत. आता इंडियन रोडमास्टरने त्याच्या गॅरेजमध्ये चारचांद लावले आहेत.

Indian_Roadmaster

विंटेज आणि क्लासी इंडियन रोडमास्टर!
इंडियन रोडमास्टर बाईक ही अमेरिकेची मोटरसायकल बनवणाऱ्या कंपनीच्या भारतीय फ्लॅगशिपअंतर्गत मिळते. इंडियन रोडमास्टरची सर्वोत्कृष्ट क्रूजर बाईकमध्ये गणना होते. विंटेज आणि क्लासी स्टाईल ही या बाईकची खासियत आहे. माधवनची बाईक ब्लॅक अँड आयव्हरी रंगाची आहे.

इंडियन रोडमास्टरची वैशिष्ट्ये
या बाईकचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टचस्क्रीन सिस्टीमसह म्युझिक आणि नेव्हिगेशनचा पर्यायही यात आहे. याशिवाय एलईडी लाईट्स, यूएसबी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, क्रूज कंट्रोल आणि रिमोट लॉकिंग या अत्याधुनिक सुविधा बाईकची शान वाढवतात.

या बाईकमध्ये 1811 सीसी थंडरस्ट्रोक 111, व्ही- ट्वीन इंजिनची सोय असून, बाईकला स्मार्टफोन जोडण्याचीही सोय आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV