अद्यापही ऑस्ट्रेलिया संघात परतण्याची ब्रॅड हॉगला आशा

'मी वयाचा विचार करत नाही. मी आताही वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटत नाही की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी संन्यास घेईन. कारण की, देशासाठी खेळणं ही सन्मानाची बाब आहे.' असं हॉग म्हणाला.

अद्यापही ऑस्ट्रेलिया संघात परतण्याची ब्रॅड हॉगला आशा

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ब्रॅड हॉग फेब्रुवारीमध्ये 47 वर्षांचा होणार आहे. पण अद्यापही या चायनामन गोलंदाजानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही.

कारण, आपण संघात पुनरागमन करु अशी त्याला आशा वाटते. ऑस्ट्रेलिया-भारत वनडे मालिकेदरम्यान हॉग समालोचनही करत होता. दरम्यान, त्याच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली नसती तर तो यावेळेस प्रथम श्रेणी क्रिकेटच्या तयारीत व्यस्त असता.

'मी वयाचा विचार करत नाही. मी आताही वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटत नाही की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी संन्यास घेईन. कारण की, देशासाठी खेळणं ही सन्मानाची बाब आहे.' असं हॉग म्हणाला.

टी-20 क्रिकेटमुळे अनेक खेळाडूंचं करिअर वाढलं आहे. भारताचा 38 वर्षीय जलदगती गोलंदाज आशिष नेहरा याचं उत्तम उदाहरण आहे. सात ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी नेहराची निवड करण्यात आली आहे.

हॉगनं ऑस्ट्रेलियासाठी 2014 साली शेवटचा सामना खेळला होता. तेव्हा त्याचं वय 44 वर्ष होतं. पण त्याला आजही असं वाटतं की, तो अद्यापही चांगली गोलंदाजी करु शकतो. तो बिग बॅश लीगमध्ये नियमित खेळतो. तर मागील वर्षी आयपीएलमध्येही खेळला होता.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV