VIDEO : हवेत सूर मारुन पांड्यानं टिपला अप्रतिम झेल!

फलंदाजीत फारशी चमक दाखवता न आलेल्या पांड्यानं मात्र, क्षेत्ररक्षणात आपली चुणूक दाखवून दिली.

VIDEO : हवेत सूर मारुन पांड्यानं टिपला अप्रतिम झेल!

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या टी-20 सामन्यात दिल्लीच्या कोटला स्टेडियमवरच्या या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी २०३ धावांचं आव्हान दिलं आहे. पण या सामन्यात सध्या चर्चा फक्त हार्दिक पांड्यांनं घेतलेल्या एका झेलचीच सुरु आहे.

या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मानं अर्धशतकं झळकवली. दोघांनी तब्बल 158 धावांची भागीदारी केली. पण तुफान फटकेबाजी करणारा धवन 80 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीच्या आधी धडाकेबाज हार्दिक पांड्याला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. पण यावेळी पांड्याला फारशी चमक दाखवता आली नाही. तो शून्यावर बाद झाला.

फलंदाजीत फारशी चमक दाखवता न आलेल्या पांड्यानं मात्र, क्षेत्ररक्षणात आपली चुणूक दाखवून दिली. कर्णधार कोहलीनं दुसऱ्या षटकात चेंडू चहलाच्या हाती सोपवला. त्याची ही चाल यशस्वी ठरली. चहलला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न सलामीवर गप्टिलनं केला. त्यानं मारलेला फटका बराच वर गेला. त्यानं मारलेला चेंडू सीमापार करणार असं वाटत असतानाच उजवीकडून धावत आलेल्या पांड्यानं अक्षरश: हवेत सूर मारुन गप्टिलचा अप्रतिम झेल टिपला. त्याच्या या झेलनंतर मैदानातील प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा एकच जल्लोष केला.

पांड्यानं घेतलेल्या या झेलनं मैदानावरील प्रेक्षकांसोबत खेळाडूही अचंबित झाले. पण पुढच्याच षटकातच त्यानं एक सोपा झेलही सोडला. त्यानंतर ट्विटरवर हार्दिक पांड्या ट्रेंड होऊ लागला.

VIDEO :

 

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Brilliant Catch by Hardik Pandya in first t 20 match vs NZ
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV