विराटच्या नाबाद 85 धावा, टीम इंडिया दुसऱ्या दिवसअखेर 183/5

टीम इंडिया अजूनही 152 धावांनी पिछाडीवर आहे.

विराटच्या नाबाद 85 धावा, टीम इंडिया दुसऱ्या दिवसअखेर 183/5

सेन्चुरियन : कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 85 धावांच्या खेळीने टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 183 धावांची मजल मारली. टीम इंडिया अजूनही 152 धावांनी पिछाडीवर आहे.

सलामीचा लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा लवकर माघारी परतल्यानंतर मुरली विजय आणि विराट कोहलीने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी साकारली. मुरली विजयने 6 चौकारांसह 46 धावांचं योगदान दिलं.

मुरली विजय 46 धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या रोहित शर्माने केवळ 10 धावा केल्या. तर त्याच्यापाठोपाठ 19 धावांवर पार्थिव पटेलही बाद झाला. हार्दिक पंड्या आणि विराट कोहली सध्या खेळत आहेत.

त्यापूर्वी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव 335 धावांवर गुंडाळला होता. भारताकडून आर. अश्विनने सर्वाधिक 4, तर इशांत शर्माने 3 आणि मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Centurion
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV