विराट कोहलीसह बिग बींनाही ख्रिस गेलचं आव्हान

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Tuesday, 5 April 2016 7:30 PM
विराट कोहलीसह बिग बींनाही ख्रिस गेलचं आव्हान

मुंबई : टी 20 विश्वचषकात वेस्ट इंडिजचा चॅम्पियन्स डान्स चांगलाच गाजला. डीजे ब्राव्होचं गाणं अनेक क्रिकेट चाहत्यांच्या ओठात बसलं आहे. भारतावर विजय मिळवल्यानंतर विंडीजचा हा डान्स सर्वांना दिसला आणि पाठोपाठ जगभरातील प्रेक्षक गाण्याच्या सिग्नेचर स्टेप्सवर थिरकले.

सोशल मीडियावर सध्या अनेक जण चॅम्पियन डान्स करुन व्हिडिओ अपलोड करत आहेत. या व्हिडिओनंतर इतरांना ही स्टेप करुन व्हिडिओ अपलोड करण्याचं आव्हान दिलं जातं. काही वर्षांपूर्वी कोल्ड बकेट, मूव्ही बकेट चॅलेंजचं लोण आलं होतं, त्याचप्रमाणे हे एकमेकांना नॉमिनेट करुन ‘परंपरा’ पुढे राखण्याचं आव्हान.

टीम इंडियाची वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये हजेरी

वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने टीम इंडियाचा चॅम्पियन विराट कोहली आणि बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट अमिताभ बच्चन यांना आव्हान दिलं आहे. त्याचसोबत दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू एबी डीव्हिलिअर्सलाही चॅलेंज देण्यात आलं आहे. डीजे ब्राव्होने सुरुवातीला गेलला नॉमिनेट केलं होतं.

VIDEO: हॉटेलमध्ये वेस्ट इंडिजचं कॅरेबियन स्टाईल सेलिब्रेशन

आता गेलने दिलेलं हे आव्हान कोहली आणि बिग बी स्वीकारणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

घरी आलेल्या गेलकडे बिग बींची मागणी, महानायकाला गेलचा रिप्लाय

पाहा व्हिडिओ :

Accepted your challenge @djbravo47 now I nominate @amitabhbachchan @virat.kohli @abdevilliers17 #Champion

Posted by Chris Gayle-SPARTAN on Saturday, April 2, 2016

First Published: Tuesday, 5 April 2016 7:20 PM

Related Stories

कोलकात्याची दिल्लीवर मात, गुणतालिकेत पुन्हा अव्वल
कोलकात्याची दिल्लीवर मात, गुणतालिकेत पुन्हा अव्वल

कोलकाता : कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाच्या अर्धशतकी

हिंदकेसरी किताबासाठी पुण्याच्या आखाड्यात पैलवानांचा शड्डू
हिंदकेसरी किताबासाठी पुण्याच्या आखाड्यात पैलवानांचा शड्डू

पुणे : देशभरातून पुण्यात दाखल झालेल्या पैलवानांनी बाबूराव सणस

अकमल-जुनैदचा वाद चव्हाट्यावर, पीसीबीकडून कारवाईची शक्यता
अकमल-जुनैदचा वाद चव्हाट्यावर, पीसीबीकडून कारवाईची शक्यता

इस्लामाबाद : पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज उमर अकमल आणि गोलंदाज

सुकमा हल्ला : गंभीर शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार
सुकमा हल्ला : गंभीर शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज गौतम गंभीरने अतिशय

आयपीएलमध्ये धोनीच्या विक्रमाशी उथप्पाची बरोबरी
आयपीएलमध्ये धोनीच्या विक्रमाशी उथप्पाची बरोबरी

पुणे : कोलकात्याचा यष्टिरक्षक रॉबिन उथप्पानं पुण्याच्या तीन

प्रेग्नन्सी गुप्त ठेवायची होती, पण... सेरेना विल्यम्सची कबुली
प्रेग्नन्सी गुप्त ठेवायची होती, पण... सेरेना विल्यम्सची कबुली

न्यूयॉर्क : महिला टेनिसची सुपरस्टार सेरेना विल्यम्सनं आपण

अडचणीतील सुपरफॅनला सचिनची तातडीची मदत
अडचणीतील सुपरफॅनला सचिनची तातडीची मदत

मुंबई: इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघनिवड जाहीर करण्याची

जेट एअरवेजच्या पायलटवर हरभजनचा संताप, वर्णद्वेषाचा आरोप
जेट एअरवेजच्या पायलटवर हरभजनचा संताप, वर्णद्वेषाचा आरोप

मुंबई:  टीम इंडियाचा क्रिकेटपटू हरभजन सिंहने जेट एअरवेजच्या

Champions Trophy 2017: मुदत संपली, पण अजूनही भारतीय संघाची घोषणा नाही
Champions Trophy 2017: मुदत संपली, पण अजूनही भारतीय संघाची घोषणा नाही

मुंबई: इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघनिवड जाहीर

आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये महसुलावरुन वाद
आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये महसुलावरुन वाद

मुंबई: आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये महसूल वाटून घेण्याच्या पद्धतीवरून