VIDEO : अप्रतिम झेल, 22 वर्षीय क्रिकेटरची कमाल!

टी-20मध्ये सामना कधी कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगता येत नाही.

VIDEO : अप्रतिम झेल, 22 वर्षीय क्रिकेटरची कमाल!

फ्लोरिडा : वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबिअन प्रीमियर लीगच्या चौथ्या सामन्यात सेंट किट्सच्या अॅण्ड नेविस पेटरिओट्स संघानं गयाना अमेझॉनवर 4 धावांनी थरारक विजय मिळवला. गयानानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला. यावेळी सेंट किट्सनं 20 षटकात 132 धावा केल्या.

132 धावांचा पाठलाग करताना गयानानं सावध सुरुवात केली. त्यानंतर ते हळूहळू विजयाच्या दिशेनं वाटचाल करु लागले होते. 17व्या षटकापर्यंत गयानाच्या संघानं 3 विकेट गमावून 102 धावा केल्या होत्या. गयाना संघाला 24 चेंडूत 31 धावांची गरज होता. पण टी-20मध्ये सामना कधी कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगता येत नाही. असंच काहीसं या सामन्यातही झालं.

17व्या षटकात हसन अलीच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जेसन मोहम्मदनं केला. जेसननं फटकाही चांगला मारला. पण त्याच्य वेळी सीमारेषेवर उभा असलेला फेबियन एलननं असा काही झेल घेतला की, सारेच अचंबित झाले.

सब्सटिट्यूट म्हणून मैदानात आलेल्या फेबियनं अक्षरश: हवेत झेपावून जेसनचा झेल टिपला. त्याचा हा झेल पाहून सर्वच अवाक् झाले. त्यानंतर गयानाचा संपू्र्ण संघ 27 धावांचा आतच ढेपाळला आणि सेंट किट्सनं 4 धावांनी विजय मिळवला. पण फेबियननं घेतलेला तो झेल या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला होता.

VIDEO :

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV