VIDEO : जेव्हा ख्रिस गेल सनी लियॉनीच्या गाण्यावर थिरकतो...

गेलने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला, ज्यात तो अभिनेत्री सनी लियॉनीच्या 'लैना' गाण्यावर थिरकत आहे.

VIDEO : जेव्हा ख्रिस गेल सनी लियॉनीच्या गाण्यावर थिरकतो...

मुंबई : वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल मैदानात जेवढा आक्रमक असतो, तेवढाच कूल मैदानात असतो. ख्रिस गेलला तुम्ही 'चॅम्पियन'वर डान्स करताना पाहिलं असेल. पण गेलला कधी हिंदी गाण्यावर डान्स करताना पाहिलं आहे, नाही ना?

होय, गेलने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला, ज्यात तो अभिनेत्री सनी लियॉनीच्या 'लैना' गाण्यावर थिरकत आहे.

या व्हिडीओमध्ये गेलच्या मागे हिरव्या रंगाचा पदडा आहे, ज्यावरुन तो जाहिरातीचं शूटिंग करत असल्याचं स्पष्ट होतं.

व्हिडीओ पोस्ट करताना गेलने लिहिलं आहे की, “जो कोणी अशाप्रकारे डान्स करेल त्याला मी 5 हजार डॉलर देणार. हे आव्हान केवळ पुरुषांनाच नाही तर महिलांनाही आहे.”
ख्रिस गेल लवकरच फुटबॉल टीम खरेदी आणि भारतीय स्टार्टअप्समध्ये पैसा लावण्याच्या तयारीत आहे. जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटरच्या बाबतीत गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गेल भलेही वेस्ट इंडिजसाठी कमी क्रिकेट खेळतो, पण त्याने 2017 मध्ये विविधी टी20 लीगमधून 4.5 मिलियन डॉलर तर जाहिरातींमधून 3 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV