नाताळ साजरा केल्यामुळे क्रिकेटपटू मोहम्मद कैफ ट्रोल

कैफने ख्रिस्ती सण साजरा केल्यामुळे नाराज झालेल्या फॉलोवर्सनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं आहे.

नाताळ साजरा केल्यामुळे क्रिकेटपटू मोहम्मद कैफ ट्रोल

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. नाताळच्या शुभेच्छा देत फोटो पोस्ट केल्यामुळे कैफवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

मोहम्मद कैफने पत्नी आणि मुलांसोबत ख्रिसमस साजरा केल्यानंतर फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये कैफने सांताक्लॉजची टोपी घातली आहे, तर बाजूला ख्रिसमस ट्री दिसत आहे. 'मेरी ख्रिसमस! सर्वत्र प्रेम आणि शांतता नांदू दे.' अशा शुभेच्छा त्याने दिल्या आहेत.कैफने ख्रिस्ती सण साजरा केल्यामुळे नाराज झालेल्या फॉलोवर्सनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं आहे. कैफने इस्लाम धर्माची परंपरा धुडकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुलासोबत बुद्धिबळ खेळतानाचा फोटो, मोहम्मद कैफ ट्रोल


यापूर्वी बुद्धिबळ खेळणं, सूर्यनमस्कार घालणं आणि तिहेरी तलाकची बाजू मांडल्यामुळे कैफला ट्रोल करण्यात आलं होतं.

इस्लाममध्ये वाढदिवसाची प्रथा नाही, मुलीच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर शमी ट्रोल


कैफप्रमाणेच क्रिकेटपटू मोहम्मद शमीलाही पत्नीसोबतचे फोटो शेअर केल्यामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. शमीने याला चोख प्रत्युत्तरही दिलं होतं. मात्र त्यानंतर मुलीचा वाढदिवस का साजरा केला असा प्रश्न विचारच शमीला पुन्हा ट्रोल करण्यात आलं.

रक्षाबंधन सेल्फीनंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल


रक्षाबंधन साजरा केल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर क्रिकेटपटू इरफान पठाणला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. इरफानने पत्नी सफा बेगसोबत फोटो शेअर केला होता.

फेसबुकवर पत्नीसोबतचा फोटो शेअर केल्यानं इरफान ट्रोल


या फोटोमध्ये सफा आपला चेहरा हातानं झाकत असल्याचं दिसत होतं. यावरुनही अनेकांनी ट्रोल करणं सुरु केलं होतं.

संबंधित बातम्या :


तिहेरी तलाक निर्णयावर कैफचं ट्वीट, कट्टरतावाद्यांकडून ट्रोल


मुलासोबत बुद्धिबळ खेळतानाचा फोटो, मोहम्मद कैफ ट्रोल


सूर्यनमस्काराच्या फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, मोहम्मद कैफचं प्रत्युत्तर


इस्लाममध्ये वाढदिवसाची प्रथा नाही, मुलीच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर शमी ट्रोल


पत्नीसोबतच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट, शमीचं सडेतोड उत्तर


पत्नीसोबतचा फोटो शेअर करुन शमीच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा!


रक्षाबंधन सेल्फीनंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल


फेसबुकवर पत्नीसोबतचा फोटो शेअर केल्यानं इरफान ट्रोल

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Cricketer Mohammad Kaif Trolled for posting Christmas Photo With Family on Twitter latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV